मुंबई - गेल्या काही वर्षातील मराठी चित्रपटांबाबत चर्चा सुरु झाली की, सैराटवर सर्वाधिक बोलले जाईल किंवा बोलले जात असेल यात काहीही शंका नाही. यामागे वेगळे कारण सांगण्याचीही गरज नसावी, कारण या चित्रपटाची जादू अजूनही कायम असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. चित्रपटाचे संगीत, आर्ची, परशा, लंगड्या, सल्या आणि या सर्वांनी सांगड घालणारा नागराज यांनी गेल्या वर्षभरात सर्वांच्या हृदयात स्थान मिळवले आहे.
सैराटने आजवर मिळवलेल्या यशामध्ये लवकरच आणकी एक मानाचा तुरा खोवला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. सैराटचे विविध भाषांमध्ये रिमेक होणार अशी बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली आहे. त्यापैकी काही चित्रपटांच्या कामाला सुरुवातही झाली असल्याचे समजतेय. निर्माता करण जोहर सैराटच्या प्रेमात पडला असून, तो थेट
बिग बी बरोबर हा चित्रपट हिंदीत तयार करणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी नागराज मंजुळेंकडेच देण्यात येणार असल्याची माहितीदेखिल मिळत आहे.
बिग बींवरही सैराटची 'झिंग'
मराठीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या सैराट या चित्रपटाने हिंदी सिनेसृष्टीतील अनेक लोकांवर आपली छाप सोडली आहे. आमीर खानपासून ते अनेक बड्या हस्तींची नावे या यादीत आहेत. आता या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे बिग बी
अमिताभ बच्चन. नुकतीच २६ जानेवारी रोजी
अमिताभ बच्चन यांनी फेसबूकवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी सैराट चित्रपट पाहिला आणि तो भावला असल्याची भावना व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टनंतर अमिताभ सैराटमध्ये काम करणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा, अमिताभ बच्चन यांनी केलेली फेसबूक पोस्ट..
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)