आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझा नवरा Possessive आणि Nagging Husband आहे’, सांगतेय अमृता खानविलकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमांशू आणि अमृताचा लग्नाच्यावेळी काढलेला फोटो
अभिनेत्री अमृता खानविलकरने याच वर्षी २४ जानेवारीला तिचा दहा वर्षांपासूनचा बॉयफ्रेंड, अभिनेता हिमांशू मल्होत्राशी लग्न केलं. आणि आता लग्नाला सहा महिने पूर्ण होतं असताना, या नववधूला तिच्या संसाराबद्दल आणि नव-याबद्दल विचारल्यावर तिच्या गालावर एकदम लाली पसरते. आणि लटक्या रागात ती म्हणते, “हिमांशू टिपीकल नवरा आहे. त्याला मी सतत जवळ हवी असते. जर मी एक दिवसही इतर काही कामात अडकले, आणि त्याच्यासाठी वेळ देऊ नाही शकले, तर मग त्याची कुरबूर सुरू होते. मग तो माझ्याशी न बोलता, एकदम शांत होऊन जातो. असं झालं की मग मी आजकाल समजून जाते. की त्याचं काहीतरी बिनसलंय.”
“लग्नाअगोदर तो असा नव्हता. खूप परिपक्वपणे बोलायचा. आम्ही एखाद्या कपलप्रमाणे सतत एकमेकांसोबत चिटकून नाही राहायचो. पण आता लग्नानंतर कधी कधी माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी तो काही ना काही लहान मुलांसारखं वागतो. एकदम Attention Seeker झालाय तो. त्याला माझ्यासोबत लहान मुलासारखं मस्ती करायला आवडतं. मी सतत त्याच्या पाठी-पाठी फिरावं असं त्याला वाटतं. कधी कधी, एकदम नवरेगिरी करतो. अगदी Possessive आहे तो माझ्यासाठी. पण याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. कारण त्यामागे त्याचं प्रेम आहे. आत्ताचं लग्न झालंय, आणि हाच काळ नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवावासा वाटतो.”
सध्या अमृता आणि हिमांशू नच बलिये-७ मधले स्पर्धक आहेत. त्यामुळे जसं हिमांशूला हवं तसं सध्या या कार्यक्रमामूळे दोघंही सतत एकत्र असतात. या सहवासाबद्दल अमृता पूढे सांगते, “दहा वर्षांच्या सहवासात जेवढं एकमेकांना समजून घेतलं नव्हतं, ते दोन महिन्यांच्या सहवासात समजून घेतलं. कारण आजपर्यंत नेहमीच वेगवेगळं काम केलंय. करीयरच्या सुरूवातीला आम्ही एकत्र काम केले होते. त्यानंतर अनेक वर्षांनी आम्ही एकत्र काम करू शकलोय. सातत्याने एकत्र राहायला मिळाल्याने एकमेकांना जास्त चांगलं समजून घेता आलंय .”
पूढील स्लाइडमध्ये वाचा, हिमांशू आणि अमृता काय म्हणतात प्रेमाने एकमेकांना