आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 6 महिन्यात अमृता-हिमांशूचे चमकले नशीब, जाणून घ्या कशी मिळाली हिमांशूला \'बलिये\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता आणि हिमांशू नच बलियेच्या ट्रॉफीसोबत. - Divya Marathi
अमृता आणि हिमांशू नच बलियेच्या ट्रॉफीसोबत.
मुंबई: 'नच बलिये' या डान्स रिअॅलिटी शोच्या सातव्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा या जोडीने विजेतेपद पटकावले. अमृता आणि हिमांशू ही जोडी स्पर्धेत सुरुवातीपासूनच चर्चेत होती. जबरदस्त परफॉर्मन्स देत या जोडीने आपला दबदबा कायम ठेवला होता. मात्र, इतर स्पर्धकही तेवढ्याच ताकदीचे होते. त्यामुळे अंतिम फेरीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती. अखेर अमृता खानविलकर आणि हिमांश मल्होत्रा या जोडीनेच विजेतेपद मिळवले. त्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. सचिन-सुप्रियानंतर 'नच बलिये'मध्ये कमाल करणारी अमृता ही दुसरी मराठी कलाकार ठरली आहे.
'नच बलिये'च्या या पर्वात सेलिब्रिटी स्पर्धकांचा केवळ डान्सच नव्हे तर त्यांच्यातील बाँडिंगसुद्धा परीक्षकांनी निरखून पाहिली. वेगवेगळे आव्हान पेलत अमृता आणि हिमांशूने एकमेकांचे उत्कृष्ट बलिये असल्याचे सिद्ध केले. विशेष म्हणजे लग्नाच्या सहा महिन्यांतच अमृता आणि हिमांशूला मोठे यश मिळाले आहे. याचवर्षी 24 जानेवारी रोजी हे दोघे विवाहबद्ध झाले. लग्नानंतर पहिल्यांदाच ही जोडी नॅशनल टेलिव्हिजनवर एकत्र दिसली. हिमांशू आणि अमृता यांची स्ट्राँग बाँडिंग या शोमध्ये त्यांच्या चाहत्यांना बघायला मिळाली. मात्र हे दोघे एकमेकांना कसे भेटले, त्यांचे सूत नेमके कसे जुळले, याची इंट्रेस्टिंग स्टोरी आहे. ती आम्ही तुम्हाला येथे सांगत आहोत..
अशी सुरु झाली लव्हस्टोरी..
अमृता आणि हिमांशू लग्नगाठीत अडकण्यापूर्वी 10 वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची पहिली भेट ही ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. दहा वर्षे या दोघांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि यावर्षी 24 जानेवारी रोजी वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत हिमांशू आणि अमृता बोहल्यावर चढले.
अमृता सांगते टिपिकल नवरा आहे हिमांशू...
Divyamarathi.com ला अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत अमृताने हिमांशू नवरा म्हणून कसा आहे, हे सांगितले होते. अमृताने सांगितले, "हिमांशू टिपिकल नवरा आहे. त्याला मी सतत जवळ हवी असते. जर मी एक दिवसही इतर काही कामात अडकले आणि त्याच्यासाठी वेळ देऊ नाही शकले, तर मग त्याची कुरबूर सुरू होते. मग तो माझ्याशी न बोलता, एकदम शांत होऊन जातो. असं झालं की मग मी आजकाल समजून जाते. की त्याचं काहीतरी बिनसलंय. लग्नाअगोदर तो असा नव्हता. खूप परिपक्वपणे बोलायचा. आम्ही एखाद्या कपलप्रमाणे सतत एकमेकांसोबत चिटकून नाही राहायचो. पण आता लग्नानंतर कधी कधी माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्यासाठी तो काही ना काही लहान मुलांसारखं वागतो. एकदम Attention Seeker झालाय तो. त्याला माझ्यासोबत लहान मुलासारखं मस्ती करायला आवडतं. मी सतत त्याच्या पाठी-पाठी फिरावं असं त्याला वाटतं. कधी कधी, एकदम नवरेगिरी करतो. अगदी पझेसिव्ह आहे तो माझ्यासाठी. पण याबद्दल माझी काही तक्रार नाहीये. कारण त्यामागे त्याचं प्रेम आहे. आत्ताचं लग्न झालंय आणि हाच काळ नवीन लग्न झालेल्या जोडप्याला एकमेकांच्या सहवासात जास्तीत जास्त काळ घालवावासा वाटतो.”
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि छायाचित्रांमध्ये पाहा, अमृता आणि हिमांशूच्या स्ट्राँग बाँडिंगची खास झलक...