आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amruta Khanvilakar & Himanshoo Malhotras Pre Wedding Photoshoot And Video

10 वर्षांच्या रिलेशनशिपचे 6 महिन्यांपूर्वी लग्नात रुपांतर, पाहा अमृता-हिमांशूचा प्री वेडिंग VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमृता आणि हिमांशूचा प्री वेडिंग व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा. - Divya Marathi
अमृता आणि हिमांशूचा प्री वेडिंग व्हिडिओ बघण्यासाठी क्लिक करा.

मराठीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर दिल्लीचा मुंडा हिमांशू मल्होत्रासोबत याचवर्षी 24 जानेवारी रोजी लग्नबेडीत अडकली. या दोघांच्या लग्नाला उद्या म्हणजे 24 जुलैला सहा महिने पूर्ण होत आहे. लग्नाच्या सहा महिन्यातच अमृता आणि हिमांशूने 'नच बलिये 7' चा किताब आपल्या नावी केला.
हे दोघेही गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे.
जानेवारीमध्ये लग्नगाठीत अडकण्यापूर्वी या दोघांनी प्री वेडिंग फोटोशूट केले होते. या फोटोशूटमधील दोघांची केमिस्ट्री लाजवाब आहे. या फोटोशूटमध्ये अमृता आणि हिमांशूचा लाडीक अंदाज बघायला मिळतोय. पिवळा आणि गुलाबी रंगाच्या सलमावसूटमध्ये अमृता खूप सुंदर दिसत आहे. तर हिमांशूसुद्धआ ब्लॅक सूटमध्ये हॅण्डसम दिसतोय. अगदी मेड फॉर इच अदर अशी ही जोडी आहे.
या दोघांची हीच केमिस्ट्री दाखवणारा त्यांचा प्री वेडिंग व्हिडिओ आम्ही तुम्हाला या पॅकेजमध्ये दाखवत आहोत. सोबतच त्यांच्या प्री वेडिंग फोटोशूटचीही खास झलक तुम्हाला पुढील स्लाईड्समध्ये पाहता येणार आहे.