आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : आर्ची-परशा आणि नागराज मंजुळेंनंतर आता अमृता-अंकुशचा मेणाचा पुतळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘सैराट’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता आकाश ठोसर आणि चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे मेणांचे पुतळे लोणावळ्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सुनील सेलिब्रेटीज वॅक्स म्युझियम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे नव्याने सुरु झालेल्या वॅक्स म्युझियम येथे उभारण्यात आले आहेत. देवगड येथील वॅक्स म्युझियम याचवर्षी 10 मे रोजी सुरु झाले. आर्ची-परशा अर्थातच रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर यांच्यानंतर आता येथील वॅक्स म्युझियममध्ये महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सुपरस्टार अंकुश चौधरी यांचा मेणाचा पुतळा साकारला जातोय. येत्या 21 ऑगस्ट रोजी अमृताच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
 
वॅक्स कलावंत सुनील कंडलूर यांनी अमृता आणि अंकुश यांचे मेणाचे पुतळे बनवण्याचे काम हाती घेतले आहे.  पुतळ्यासाठी आवश्यक मोजमाप घेतल्यानंतर सुनील हे या पुतळ्यांचे काम पूर्ण करणार आहेत. सुनील यांनीच रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, नागराज यांच्यासह शंभरहून अधिक नावाजलेल्या लोकांचे मेणाचे पुतळे तयार केले आहेत.  

लंडनमधील मादाम तुसॉदच्या धर्तीवर देवगड येथे उभारण्यात आलेल्या वॅक्स म्युझियमने स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ठिकाणी आतापर्यंत शंभरावर पुतळे साकारण्यात आले आहेत. त्यात महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, कपिल देव, महानायक अमिताभ बच्चन, सुपरस्टार रजनीकांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतळे लक्षवेधी ठरले आहेत.

पुढे बघा, मेणाच्या पुतळ्यासाठी माप देताना क्लिक झालेली अमृताची छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...