आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पती हिमांशुशिवायही अमृताने केले आहे दुसऱ्या मुलाला डेट, हिमांशुनेही केले होते दुसऱ्या मुलीला KISS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क - आज अभिनेत्री अमृता खानविलकर तिचा 32 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहे. 23 नोव्हेंबर 1984 साली मुंबईत जन्मलेली अमृता मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री आहे. नुकताच अमृताने तिच्या वाढदिवसाचे प्री सेलिब्रेशन कर्णबधीर मुलांच्या शाळेत जाऊन केले. अमृता दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 24 जानेवारी 2015 साली विवाहबंधनात अडकली होती. नऊ वर्षे रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर अमृता बॉयफ्रेंड हिमांशुसोबत लग्नाचा निर्णय घेतला होता. पण या परफेक्ट लव्हस्टोरीमागे काही गोष्टींचा खुलासा खुद्द अमृता-हिमांशुने 'नच बलिए 7'च्या सेटवर केला होता. अमृताने केले दुसऱ्या मुलाला डेट...

 

अमृता आणि हिमांशु हे दोघेही उत्तम अभिनेते तर आहेच पण ते किती बेस्ट डान्सर्स आहेत हे त्यांनी नच बलिए 9 मध्ये सिद्ध केले. यातील त्यांच्या प्रत्येक परफॉर्मन्सने लोकांची मने जिंकली होती. या शोमध्ये कन्फेशन राऊंडदरम्यान प्रत्येक जोडप्याला एक गोष्ट एकमेकांसमोर स्टेजवर सांगायची होती त्यावेळी हिमांशुने त्यांच्या रिलेशनशीपबद्दल एक खुलासा केला.

 

हिमांशुने सांगितल्यानुसार, नऊ वर्षाच्या रिलेशनशीपदरम्यान अमृता आणि हिमांशु यांच्यात इतर कोणत्याही कपलप्रमाणे भांडणे होत असत. त्यामुळे अमृताने हिमांशुसोबतचे रिलेशनशीप तोडले आणि ती दुसऱ्या मुलाला डेट करु लागली होती. पण काही दिवसांनंतर तिला हिमांशुची आठवण यायला आणि ते रिलेशनशीप सोडून ती पुन्हा हिमांशुकडे आली होती. 

 

तर दुसरीकडे, अमृताला जळवण्यासाठी हिमांशुने दुसऱ्या मुलीला किस केले होते. त्यावेळी तो इतका मोठा इश्यू होईल असे वाटले नव्हते पण नंतर हिमांशुला त्याची चुक कळाली होती आणि त्याने सर्वांसमोर अमृताची माफी मागितली. पण अमृताने हिमांशुबद्दल अजूनही मनात राग असल्याचेही सांगितले. ज्या मुलीला हिमांशुने किस केले होते त्या मुलीने अमृताचा सर्वांदेखत अपमानही केला होता पण त्यावेळी हिमांशुने त्यावेळी बाजू घेतली नसल्याची खंत राहील असे अमृताने सांगितले होते. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृता आणि हिमांशु यांचे काही रोमँटीक फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...