आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amruta Khanvilkar And Himanshoo Malhotra To Tie The Knot Today

या तरुणासोबत आज अमृता अडकणार लग्नगाठीत, जाणून घ्या कशी सुरु झाली यांची लव्हस्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर)
मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर आज विवाहबद्ध होतेय. तिच्या भावी पतीचे नाव आहे हिमांशू मल्होत्रा. हिमांशू हा टीव्ही स्टार आहे.
दिल्ली का मुंडा, मुंबईकी लडकी
मूळ दिल्लीचा असलेला हिमांशू मल्होत्रा झी टीव्हीवरील ‘आपकी अंतरा’ या मालिकेत समीरच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. सध्या तो ‘लव्ह मॅरेज या अरेंज मॅरेज’ या सोनी चॅनेलवरील मालिकेत अनुप या तरुणाची भूमिका साकारत आहे. मुंबईची अमृता आता दिल्लीकर हिमांशूच्या गळ्यात माळ घालणार आहे.

अशी सुरु झाली लव्हस्टोरी..
अमृता आणि हिमांशू गेल्या 10 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जाते. एमबीए केलेल्या हिमांशूची आणि अमृताची भेट ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार..’ या शोमध्ये झाली होती. याच शोमध्ये मुंबईची मुलगी अमृता आणि दिल्लीचा मुंडा हिमांशू या दोघांचे सूर जुळून आले होते. त्यावेळी दोघेही स्ट्रगलर होते. आज अमृता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे, तर हिमांशूदेखील टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरा आहे. या दोघांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबाकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून वसंतपंचमीच्या शुभमुहूर्तावर म्हणजे आज दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत हिमांशू आणि अमृता बोहल्यावर चढणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अमृता आणि हिंमाशूची खास छायाचित्रे...