आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amruta Khanvilkar And Himmanshoo Malhotra Meet Raj Thackeray

'नच बलिये 7' चे विजेते अमृता-हिमांशूने घेतली राज ठाकरेंची भेट, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज ठाकरे यांची भेट घेताना अमृता आणि हिमांशू - Divya Marathi
राज ठाकरे यांची भेट घेताना अमृता आणि हिमांशू

महाराष्ट्राची लाडकी लेक अमृता खानविलकर आणि जावई हिमांशू मल्होत्रा यांनी नुकतेच 'नच बलिये 7' या सेलिब्रिटी कपल डान्स रिअॅलिटी शोचे विजेतेपद आपल्या नावी केले. नंदीश संधू-रश्मी देसाई, उपेन पटेल-करिश्मा तन्ना आणि मयुरेश वाडकर-अजिशा शहा या तीन जोड्यांना जोरदार टक्कर देत हिमांशू-अमृता जोडीने सातव्या पर्वाचे जेतेपद पटकावले. हा आनंद साजरा करत असतानाच अमृता पोटदुखीच्या त्रास झाला आणि तिला रुग्णालयात दाखल व्हावे लागले. मात्र आता अमृता पूर्णपणे बरी झाली असून नुकतीच तिने पती हिमांशू आणि आईसोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.
या भेटीची काही छायाचित्रे अमृताने आपल्या सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर केली आहेत. सोबतच लिहिले, ''आज मा.राजसाहेबांची ठाकरे यांची भेट घेतली..
अनेक दिग्गज मंडळींना त्यांना भेटताना पाहिले होते.. 'धन्यवाद' हा खूप लहान शब्द आहे..मनापासून आभार राज साहेब एक अविस्मरणीय अनुभव आहे आजची भेट आणि खूप खूप धन्यवाद शालिनी ठाकरे वहिनी.''
विशेष म्हणजे मनसेच्या उपाध्यक्षा शालिनी ठाकरे यांनी अमृता आणि हिमांशूला विजयी करण्यासाठी सोशल साइटवर एक व्हिडिओ पब्लिश करुन लोकांना त्यांना वोट करण्याची अपील केली होती. महाराष्ट्राने दिलेल्या भरभरुन प्रेमाने प्रेक्षकांची ही लाडकी जोडी 'नच बलिये' या हिंदी रिअॅलिटी शोची विजेती ठरली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अमृताने राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीची शेअर केलेली छायाचित्रे...