आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'बाजी'मध्ये डी-ग्लॅम लूकमध्ये झळकणार अमृता खानविलकर, पाहा विनामेकअप कशी दिसतेय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बाजी' सिनेमातील एका दृश्यात अभिनेत्री अमृता खानविलकर)
निखिल महाजन दिग्दर्शित 'बाजी' हा सिनेमा आज थिएटरमध्ये दाखल होतोय. या सिनेमात अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. सुपरहीरो थीमवर आधारित या सिनेमात श्रेयस सुपरहीरो बाजीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर जितेंद्र जोशीने मार्तंड नावाच्या व्हिलनची भूमिका वठवली आहे. मराठीतील आघाडीची आणि ग्लॅमरस अभिनेत्री अमृता खानविलकर गावात राहणा-या गौरी नावाच्या तरुणीच्या भूमिकेत दिसणार आहे.
डी-ग्लॅम लूकमध्ये झळकणार अमृता...
या सिनेमात अमृताने गावात राहणा-या गौरी नावाच्या तरुणीची भूमिका साकारली आहे. गावातील तरुणी अगदी साधी दिसावी, भूमिका रिअॅलिस्टिक वाटावी यासाठी दिग्दर्शक निखिल महाजन यांनी अमृताला विदाऊट मेकअप सिनेमात सादर केले आहे. क्वचितच अमृताने लिपबामचा उपयोग सिनेमात केला आहे.
आजवर ग्लॅमरस भूमिकेत झळकलेली अमृता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर विनामेकअपमध्ये दिसणार आहे. सिनेमातील अमृताच्या लूकची झलक बघता विनामेकअपसुद्धा ती सुंदर दिसत आहे. अमृताचे अलीकडेच म्हणजे 24 जानेवारी रोजी लग्न झाले आहे. लग्नानंतर रिलीज होणारा हा तिचा पहिलाच सिनेमा आहे.
या पॅकेजमध्ये छायाचित्रांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला 'बाजी' सिनेमातील ग्लॅमरस अमृताच्या डी-ग्लॅम लूकची खास झलक दाखवत आहोत. चला तर मग तुम्हीही पाहा विनामेकअपसुद्धा किती सुंदर दिसतेय अमृता...