आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृताची मराठमोळ्या रुपात बुलेटवर Entry,सांभाळली डान्स इंडिया डान्सच्या अँकरींगची धुरा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर उत्तम अभिनेत्री आहेच पण त्यासोबतच ती उत्तम अँकरही आहे हे तिने वेळोवेळी सिद्ध केले आहे. 2008 साली आलेल्या कॉमेडी एक्सप्रेस या शोसाठी अमृताने अँकरींग केले होते. तसेच 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटाच्या एका प्रमोशन कार्यक्रमातही अमृताने होस्टीग करत प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि शोमधील रणवीर सिंग, प्रियांका चोप्रासोबत धमालमस्ती केली होती. 
 
आता अमृता पुन्हा अँकरींग करण्यासाठी सज्ज झाली आहे. यावेळी डान्स इंडिया डान्स या रिअॅलिटी शोसाठी अमृता खानविलकर आणि साहिल खट्टर ही फ्रेश जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. आपणा सर्वांनाच माहीत आहे ती अमृता किती उत्तम नृत्यांगना आहे त्यामुळे अँकरींग करताना आपल्याला अमृताचे ठुमकेही पाहायला मिळतील अशी आशा करण्यास काही हरकत नाही. 
 
अमृताने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत त्यात डान्स इंडिया डान्स शोसाठी मुंबईचे ऑडिशन सुरु झाले आहे हे कळते. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अमृताने शेअर केलेले काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...