आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीच माझ्या रूपाची राणी गं... ट्विटरवर अमृताचे आहेत 85 हजारांहून अधिक फॉलोअर्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या चाहत्यांच्या नेहमी संपर्कात राहण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणे मराठी सेलिब्रिटीसुद्धा सोशल नेटवर्किंग साईट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून हे सेलिब्रिटी आपल्या सिनेमांबद्दलची तर कधी कधी आपल्या खासगी आयुष्यासंबंधीची गोष्टही आपल्या चाहत्यांना सांगतात. किंबहूना या सोशल साईट्स म्हणजे सेलिब्रिटींसाठी पब्लिसिटी मिळवण्याचा साधासोपा मार्गच आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

चाहतेसुद्धा या सेलिब्रिटींना ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या माध्यमातून फॉलो करत असतात.  ट्विटरवर सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येवर एक नजर टाकली असता, या सेलिब्रिटींची लोकप्रियता किती आहे, हे आपल्या लक्षात येईल.
 
आता हेच बघा ना, मराठी इंडस्ट्रीतील आघाडीची नायिका अमृता खानविलकरसुद्धा सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव आहे. तिचे ट्विटरवर तब्बल 85 हजारांहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. अमृता नित्यनेमाने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःविषयीचे अपडेट्स देत असते. विविध इव्हेंट्सचे फोटोजसुद्धा ती पोस्ट करत असते. 
 
अमृताच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिचे ग्लॅमरस लूकमधील कमीलाचे सुंदर फोटोज बघायला मिळतात. अलीकडेच तिने साडीतील एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. 
 
पाहुयात, ग्लॅमरस अमृताचे तिने स्वतः शेअर केलेले खास फोटोज... 
बातम्या आणखी आहेत...