आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृताचा \'डान्स फिव्हर\', 104 डिग्री तापात दिला परफॉर्मन्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पती हिमांशूसोबत अभिनेत्री अमृता खानविलकर.)
'नच के लिए साला कुछ भी करेगा...' अशी काहीशी अवस्था झाली आहे आपल्या ग्लॅमडॉल अमृताची… आत्ता तुम्ही विचाराल ते कसं ? तर झालय असं की अमृताला एकशे चार डिग्री ताप होता, आणि डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितला होता. पण अमृता ऐकतेय कसली? तिने त्याही अवस्थेत परफॉर्म केला.
गेले काही आठवडे अमृता आणि आपला लाडका जावई नंबर वन आहेत. तिघेही परीक्षक अमृतच्या मेहनतीच खूप कौतुक करतायत. एवढा ताप असूनही अमृताने परफॉर्म केला आणि एवढंच नाही तर 30 पैकी 30 मार्क्सही मिळवलेत… अमृता आणि हिमांशू आपल्या नवं नवीन डान्स परफॉर्म्सने परीक्षकांच आणि प्रेक्षकांचीही मन जिंकली आहेत.
नुकतंच 'भूल भूलैय्या' सिनेमातल्या गाण्यावर त्यांचा परफॉर्म्स खूपच जबरदस्त झाला. परीक्षकांनाही त्यांचा परफॉर्म्स खूप आवडला आणि त्यामुळेच अमृता आणि हिमांशूला 30 पैकी 30 मार्क्स मिळालेत. एकंदरच महाराष्ट्राची लेक आणि जावई नच बलिये'मध्ये धमाल तर करत आहेतच, पण त्यासोबतच ते नंबर वन आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अमृता आणि हिमांशूची गेल्या आठवड्यातील परफॉर्मन्सदरम्यानची छायाचित्रे...