आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Amruta Khanvilkars First Public Appearance Post Marriage

PICS: लग्नानंतर दोन दिवसांतच इव्हेंटमध्ये दिसली अमृता, पाहा नववधूचा खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री अमृता खानविलकर)
अभिनेत्री अमृता खानविलकर 24 जानेवारी रोजी लग्नगाठीत अडकली. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत दिल्लीत अमृताचे लग्न झाले. लग्न आटपून दोन दिवसांतच अमृता मुंबईत परतली आणि आपल्या दोन मित्रांच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी झाली.
27 जानेवारी रोजी अभिनेता श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने मुंबईतील अंधेरी येथे एक जंगी पार्टी आयोजित करण्यात होती. या पार्टीत अमृता सामील झाली होती. मात्र यावेळी तिच्यासोबत हिमांशू दिसला नाही.
यावेळी नववधू अमृता साडीत दिसली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होते. साडीत गुलाबी आणि काळ्या रंगाच्या साडीत अमृता खूप सुंदर दिसली. श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशी यांच्यासोबत अमृता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार असून त्यांच्या आगामी सिनेमाचे नाव 'बाजी' आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी बाजी सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे. लग्नानंतरचा अमृताचा हा पहिलाच सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा श्रेयस-जितेंद्र यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत क्लिक झालेली अमृताची खास छायाचित्रे...