आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिर खान आणि अनुराग कश्यपला पाहायचा आहे अमृता सुभाष स्टारर \'किल्ला\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अविनाश अरूण दिग्दर्शित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘किल्ला’ हा चित्रपट २६ जूनला प्रदर्शित होतो आहे. जपान, अमेरिका, ग्रीस, बर्लिन मधल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये सन्मान मिळवलेला हा चित्रपट आहे. मुलांच्या बालेकिल्यात तुम्हाला नेऊन त्यांचे एक मनोरंजक विश्व हा चित्रपट तुम्हाला दाखवतो. पण त्यासोबतच ‘तुमच्या मुलाच्या मनातले तुम्ही ओळखू शकता का’ असा प्रश्न चित्रपटातल्या पोस्टरमधनं फिल्ममेकर आपल्याला विचारतो.
याविषयी अभिनेत्री अमृता सुभाषला विचारल्यावर ती म्हणते, ”हा चित्रपट एका गावातल्या किल्ल्यात नेहमी फिरायला जाणा-या मित्रांच्या मधले नातेसंबंध आणि त्यांचे भावविश्व तर उलगडतोच. पण त्यासोबतच माय-लेकांमधल्या अनेक तटबंद्यासुध्दा चित्रपट पूढे सरकताना विरघळून जातात. आई-मुलाचे नाते कसे फुलत जाते, ते ही हा सिनेमा दाखवतो. चिन्मय काळे आणि त्याची आई अरूणा काळे हे दोघे एका शहरातून एका गावात राहायला येतात. या दोघांचे भावविश्व आणि नातेसंबंध या चित्रपटातून समोर येतात. कथेतल्या चिन्मयला खरं तरं वडिलांचा जास्त ओढा. पण वडील सिनेमाच्या सुरूवातीला जग सोडून जातात. आणि मग त्याचवेळी नवख्या वाटणा-या गांवात आई-मुलाच्या नात्यातले पदर उलगडत जातात. लहान मुलांच्या भावविश्वाची कथा असली तरीही अरूणाच्या नोकरीच्या ठिकाणी तिला येणा-या समस्याही आपल्यासमोर येतात आणि ही कथा उलगडतं जाते.”
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, आपल्या या चित्रपटाविषयी आणखी काय सांगतेय अमृता...
(पुढील सर्व फोटोः अजीत रेडेकर)