आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी हसू आणि मग आसू.. एका गंभीर मुद्द्याला हात घालणारे हे पत्र नक्की वाचा..

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही मुद्याचा किती गांभीर्याने आणि खोलवर जावून विचार करता येतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लेखक अरविंद जगतात. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील त्यांच्या अंतर्मुख करायला लावणाऱ्या पत्रांनी आजवर अनेकांना स्तब्ध निःशब्द करून सोडले आहे. विषय अगदी कोणताही असो त्याचा सामान्य जनतेची, ग्रामीण भागातील जनतेशी कसा संबंध असू शकतो. त्या विषयाशी संबंधित त्यांच्या वेदना काय असू शकतात, याचा विचार त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून समोर येत असतो. असेच काहीसे पुन्हा एकदा घडले मंगळवारी प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमातील या पत्राने. 

खरं तर सध्या ती काय करते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुरू असलेल्या एपिसोडमध्ये जेव्हा पोस्टमन काका आले तेव्हा ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचे प्रेमभावना उलगडणारे छान पत्र लिहिणार असे वाटले. पत्र वाचायला सुरुवात झाली तेव्हा म्हणजे पत्राच्या पूर्वार्धात सर्वांच्या चेहऱ्यावर छान हसू होते.. पण जसे जसे पत्र पुडे सरकत होते, सर्वांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले.. ग्रामीण भागातील कुटुंबांची, शिकण्याची इच्छा असूनही ती इच्छा दाबावी लागणाऱ्या मुलींची व्यथा अगदी प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचली..
 
पत्र संपले तेव्हा सगळेच स्तब्ध होते.. हा विषय असा मांडला जाऊ शकतो असा विचार कोणीही केला नसेल.. हीच अरविंद जगताप यांची खासीयत आहे.. आजवर त्यांनी अनेक पत्र लिहिली.. शेतकऱ्यांवरील पत्राने तर सगळ्यांनाच रडायला लावले होते.. पण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी प्रकाशित झालेल्या या भागात अरविंद यांच्या पत्राने ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा मुद्दा अशा पद्धतीने सर्वांसमोर आणला हा नक्कीच योगायोग नसावा असा विचार मनात येऊन गेला.. चला तर मग अरविंद यांच्या शब्दांच्या दुनियेत.. 

अरविंद जगताप यांनी लिहिलेले पत्र वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर..
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...