आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकरांच्या मुलीचा झाला साखरपुडा, हे आहेत #behindthescenes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिका अभ्यंकर हिने शेअर केलेला तिच्या साखरपुड्याचा खास फोटो. इनसेटमध्ये आनंद अभ्यंकर - Divya Marathi
सानिका अभ्यंकर हिने शेअर केलेला तिच्या साखरपुड्याचा खास फोटो. इनसेटमध्ये आनंद अभ्यंकर
दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची कन्या सानिका अभ्यंकर हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. सानिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर साखरपुड्याचे खास फोटोज शेअर केले आहेत. फोटोजसोबत तिने #hitched #official #engaged #behindthescenes #themoment हे हॅशटॅग दिले आहेत. सानिकाने साखरपुड्याचे फोटोज शेअर करताना तिच्या मिस्टर परफेक्शनिस्टची ओळख मात्र गुलदस्त्यात ठेवली. पण मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश कुलकर्णी हे तिच्या होणा-या नव-याचे नाव आहे.    
 
मराठी इंडस्ट्रीत आहे कार्यरत... 
सानिकाने मराठी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मालिका विश्वात सहाय्यक दिग्दर्शिका, लेखिका म्हणून ती काम करतेय. शिवाय छोट्या पडद्यावरील ढोलकीच्या तालावर या डान्स रिअॅलिटी शोमध्ये सानिका स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. 23 डिसेंबर 2012 रोजी आनंद अभ्यंकर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यानंतर सानिकाने आनंद अभ्यंकर यांच्यावर ब्लॉग लिहायला सुरूवात केली आणि त्या ब्लॉगचे रूपांतर पुस्तकात झाले. 'अलाइव्ह' (Alive) हे सानिकाच्या पुस्तकाचे नाव आहे.   

पुढे बघा, सानिकाने शेअर केलेले तिच्या साखरपुड्याचे #behindthescenes
बातम्या आणखी आहेत...