आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची ही मराठी मुलगी 'थलाईवा'सोबत करतेय स्क्रिन शेअर, पोस्ट केला सेल्फी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह काम करण्याची संधी नाशिकच्या मराठमोळ्या अंजली पाटील या अभिनेत्रीला मिळाली आहे. रजनीकांत यांच्या आगामी 'काला कारिकालन' या सिनेमात अंजली झळकणार आहे. सध्या या सिनेमाचं शूटिंग सुरु आहे. अलीकडेच अंजलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर सुपरस्टार रजनीकांत यांच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आहे. 'आयुष्यात एकाच वेळी साधं, सुंदर आणि प्रशंसनीय कसं जगावं? तर याचं उत्तर मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रजनीकांत' अशी पोस्ट तिने या फोटोसह शेअर केली आहे. 28 मे पासून या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. 

सुपरस्टार रजनीकांतसह काम करण्याची संधी मोजक्या आणि नशीबवान कलाकारानांच मिळते. राधिका आपटेनंतर आता ही संधी अंजली पाटीलला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी स्वतः अंजलीने ट्विट करुन रजनीकांतसोबत काम करत असल्याची खुशखबर तिच्या चाहत्यांना दिली आहे. अंजलीने ट्विट केले, “Next film for this year. With THE ONE AND ONLY. Thalaiva. Produced by @dhanushkraja, Directed by @beemji..#Rajnikanth #Superstar #Kaala (sic).”
 
नावाजलेली अभिनेत्री आहे अंजली... 
'काला कारिकालन' हा आगामी तामिळ सिनेमा असून रजनीकांत यांचा जावई धनुष या सिनेमाची निर्मिती करणार आहे. तर 'कबाली' फेम प.रणजिथ या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे.  अंजली पाटील पहिल्यांदाच दक्षिणेच्या सिनेमात काम करते असं नाही. याआधीही तिने दाक्षिणात्य सिनेमात काम केलं आहे. 
 
 
कोण आहे अंजली, यापूर्वी ती कोणकोणत्या सिनेमांमध्ये झळकली, याविषयीची सर्व माहिती वाचा पुढील स्लाईड्सवर...
बातम्या आणखी आहेत...