Home | Bollywood | Marathi Cinekatta | anjali serial completed its 100 episode

'अंजली' मालिकेने गाठला 100 एपिसोडचा पल्ला, कलाकारांनी धम्माल करत केली पार्टी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 01:03 PM IST

नवे पर्व युवा सर्व’ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी 'झी

  • anjali serial completed its 100 episode
    मुंबई - ‘नवे पर्व युवा सर्व’ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी 'झी युवा' ही महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच झी नेटवर्क ने लाँच केली होती. झी युवा या वाहिनीला हल्लीच १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'अंजली' चे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'अंजली' या मालिकेच्या प्रेमात अख्खी तरुणाई पडली आहे. या मालिकेतील कलाकार सुरुची अडारकर, पियुष रानडे, हर्षद अतकरी, राजन भिसे, रेशम श्रीवर्धनकर, अभिषेक गावकर , भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण, मीना सोनावणे, उमेश ठाकूर, संकेत देव, अर्चना दाणी या सर्वांनाच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय .

    एखादी मालिका जेव्हा तिचे १०० भाग यशस्वी रित्या पूर्ण करते याचाच अर्थ प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिलेली असते . सुरुची अडारकर म्हणजेच अंजली क्षीरसागर ही नाशिक जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी .डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी "मोबाईल रुग्णालय" सुरु करणे. ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरात शिकायला येते. अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटलमध्ये ती इंटर्नशिप करायला सुरुवात करते. याच हॉस्पिटलमध्ये जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. आणि अगदी बरोबर उलट डॉ. असिम म्हणजेच पियुष रानडे हा गावोगावी फिरून गरीब रुग्णाची सेवा करत आहे. सध्या अंजली आणि पियुष यांच्या एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचा प्लॉट मालिकेत सुरु असून त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अंजलीची तत्वे आणि यशस्वीची स्वप्न यात नेमका कोणाचा विजय होईल, हे सांगणारी ही मालिका आहे.
    हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटल मध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल. झी युवावर सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका पहायला मिळेल.
    पुढच्या स्लाईडवर पाहा, केक कापतानाचे कलाकारांचे काही PHOTOS..
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode
  • anjali serial completed its 100 episode

Trending