आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शूटिंगमधून वेळ काढत अंकिता पोहोचली अजमेर शरीफला, चित्रपटाच्या यशासाठी केली कामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडे तिचा पहिलाच बॉलिवूड चित्रपट 'मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी' मधून डेब्यू करत आहे. या चित्रपटात अंकिता झलकारीबाई कोळीची भूमिका करत आहे. या चित्रपटाला यश मिळावे यासाठी अंकिता अजमेर शरीफ दर्ग्यात गेली होती. 
 
मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी या चित्रपटात कंगना राणावतची मुख्य भूमिका आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या जोधपूर येथे सुरु आहे. यावेळी शूटिंगमधून वेळ काढत अंकिता येथे पोहोचली आहे. याबाबत अंकिताने सांगितले की, "मी या दर्ग्यात तिसऱ्यांदा येत आहे. मी जेव्हाही या दर्ग्यात येते आणि जी इच्छा मागते ती पूर्ण होतेच. यावेळी मी माझ्या चित्रपटाच्या यशाची प्रार्थना केली आहे."

 

या चित्रपटात अंकिताचा लुक कसा असेल याबाबत सर्वांनाच उत्सुक्ता आहे. अंकिताने काही दिवसांपूर्वी तिच्या लुकचा एक अस्पष्ट असा फोटो शेअर केला होता. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अंकिता लोखंडेच्या लुकचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...