आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ankush Chaudhari Enjoyed Rice Chapati And Mouth Watering Fish Curry On Set Of Guru

On Set: ‘गुरू’ अंकुश चौधरीला कशी मिळायची तांदळाची गरम भाकरी आणि Fishची मेजवानी, वाचा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'दूनियादारी' चित्रपटानंतर अंकुश चौधरी पून्हा एकदा संजय जाधवच्या चित्रपटात दिसणार आहे. २२ जानेवारीला झळकणा-या ह्या चित्रपटाचा फस्ट लूक टिझरने ईरॉस नाऊने युट्यूबवरून रिलीजही केलाय. थोडीशी मारधाड करणारा, स्टाइलिश अंदाजात चालणारा, मिश्कील अंकुश चौधरी ह्यातून दिसतोय.
अंकुश चित्रपटाविषयी सांगतो, “ नुकत्याच रिलीज झालेल्या ‘दगडी चाळ’मध्ये सगळ्यांना गंभीर अंकुश दिसला होता. मात्र आता ‘गुरू’ मध्ये गंमतीदार, थोडासा मस्क-या, आणि बॉय नेक्स्ट डोअर अंकुश दिसणार आहे. तो आपल्यातला वाटणारा आहे. हा आयुष्यात मस्ती-मजेला प्राधान्य देणारा मुलगा आहे. त्यात संजय जाधवचा हा सिनेमा आहे, म्हटल्यावर ह्यात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार हे आता संजयच्या चित्रपटाच्या चाहत्यांना माहितीच आहे.”
अंकुश पूढे सांगतो, “पहिल्या दिवशीचं आम्ही चित्रपटाचं जे गाणं चित्रीत केलं. त्याचाच टिझर बनवला, आणि गुरूचा लूक युट्यूबवरून अनविल झाला. उमेश जाधवची ह्या गाण्याला कोरीओग्राफी आहे. आणि वरळी कोळीवाड्यात गाण्याचं शुटिंग झालंय. गाण्याने जेव्हा चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तेव्हा एक पॉझिटीव्ह एनर्जी पूर्ण युनिटमध्ये असते. आनंदी वातावरण असतं. युनिटचा मूड चिअर-अप होतो. जास्त टेन्शनचं वातावरण नसल्याने नव्या लोकांशी ओळखी होतात. आणि मग एकमेकांशी मैत्री झाल्यावर चित्रीकरण करताना मजा येते.”
अंकुशला मासे खायला खूप आवडतात. त्यात गाण्याचे शुटिंग वरळी कोळीवाड्यात झाल्यावर ताजे मासे खाण्याचा चान्स अंकुशने आजिबात सोडला नाही. तो सांगतो, “ मी वरळी कोळीवाड्यात माझी ‘झकास’ ही फिल्म सुध्दा चित्रीत केलीय. त्यामुळे तिथल्या लोकांशी अगोदरच मैत्री झाली होती. त्यामुळे दूपारच्या जेवणात गरम-गरम तांदळाची भाकरी, आणि त्यासोबत मांदेली, किंवा, सुरमयी,किंवा पापलेट हे असायचंच. आणि आम्ही यथेच्छ ताव मारून खायचो.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा 'गुरू' मधला अंकुश चौधरीच्या गुरू चित्रपटाचा लूक