आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनुष्कानंतर अंकुश चौधरीने घेतला हातात झाडू, दादर चौपाटी स्वच्छ करायला लावला हातभार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अलीकडेच अभिनेत्री अनुष्का शर्माने वर्सोवा बीच स्वच्छ करुन लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तर बाहुबली फेम अभिनेता प्रभासने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभिनयाविषयी आपले मत व्यक्त केले. प्रभासने त्याच्या फेसबुक अकाउंटवर लिहिले, की ‘माझ्या देशाला स्वच्छ आणि स्वस्थ ठेवणे हे सामान्य नागरिक म्हणून माझे कर्तव्य आहे. जे माझ्यासारखा विचार करतात त्यांनी स्वच्छ भारतासाठी प्रयत्नरत राहायला हवे. आपला देश निश्चितच पुर्वीपेक्षा अधिक सुंदर होईल. जय हिंद!'

अभिनेता अंकुश चौधरी चौपाटी स्वच्छ करायला लावला हातभार... 
अनुष्का शर्माप्रमाणेच मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरीनेसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात मुंबईत येथे आपला सहभाग नोंदवला. 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी बीच क्लिनअप ड्राइव्हच्या टीमसोबत अंकुशने दादर चौपाटी स्वच्छ केली. यावेळी त्याच्यासोबत जय फाऊंडेशन टीम, निर्मला निकेतन सोशल वर्क कॉलेजचे विद्यार्थीसुद्धा या अभियानात सहभागी झाले होते. 

पाहुयात, संबंधित छायाचित्रे... 
बातम्या आणखी आहेत...