(अपूर्वा नेमळेकर आणि सारा श्रावण)
मुंबईः आज वटपौर्णिमा. यमाच्या तावडीतून सत्यवानाला वाचवण्या-या सावित्रीची आठवण ठेवून वटपौर्णिमा हा सण महिला सर्वत्र उत्साहाने साजरा करत असतात. हे व्रत सुवासिनी अपल्या पतिला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून करतात. सामान्य स्त्रियांप्रमाणेच अभिनेत्रीसुद्धा हा सण साजरा करताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील नावाजलेल्या अभिनेत्री सारा श्रावण आणि अपुर्वा नेमळेकर यांनी वडाच्या झाडाची पूजा करुन आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
कोण आहे अपुर्वा नेमळेकर
झी मराठी वाहिनीवरील 'आभास हा' या मालिकेद्वारे अपूर्वा घराघरांत पोहचली. या मालिकेनंतर ती 'आराधना' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत झळकली. अपुर्वाचे लग्न युवासेनेचा पदाधिकारी असलेल्या रोहन देशपांडेसोबत झाले आहे. ही अपुर्वाची लग्नानंतरची पहिलीच वटपौर्णिमा आहे. गेल्यावर्षी 18 डिसेंबरला अपुर्वा रोहनसोबत लग्नगाठीत अडकली.
कोण आहे सारा श्रावण
'पिंजरा' या गाजलेल्या मालिकेतील नकारात्मक भूमिकेमुळे सारा प्रसिद्धीझोतात आली. त्यानंतर तिने 'अनोळखी', 'तू तिथे मी' या मालिकांमध्ये काम केले. याशिवाय 'एकापेक्षा एक' या डान्सिंग रिअॅलिटी शोमध्ये आपल्या डान्सचीही झलक तिने दाखवली. साराचे लग्न गणेश सोनावणेसोबत गेल्यावर्षी 24 एप्रिलला झाले. गणेश हंगामा डिजिटल मीडियामध्ये मॅनेजर पदावर कार्यरत आहे. साराची लग्नानंतरची ही दुसरी वटपौर्णिमा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सारा आणि अपुर्वाची खास छायाचित्रे...