आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arjun Rampal Was Zapped After Seeing Makrand Deshpande\'s Look As Daddy

‘दगडी चाळ’मधल्या मकरंदच्या ‘डॅडी’ला पाहून का घाबरला बॉलीवूडचा ‘डॅडी’? जाणून घ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
अभिनेता मकरंद देशपांडे आगामी ‘दगडी चाळ’ ह्या चित्रपटामध्ये ‘डॅडी’ अरूण गवळीच्या भूमिकेत दिसणार आहे. मकरंदने अरूण गवळीची भूमिका करावी, यासठी ‘दगडी चाळ’ चित्रपटाचा नायक अंकुश चौधरीने मकरंद देशपांडेला कन्व्हिन्स केले होते.
 
त्याबद्दल मकरंद देशपांडे सांगतो, “खरं तर, सेलिब्रिटी क्रिकेट लीगमूळे मला ही भूमिका मिळाली. CCLच्या वेळी माझी आणि अंकुशची मैत्री झाली. आणि त्याने एक दिवस मला ह्या चित्रपटाविषयी सांगितलं. एवढंच नाही, तर तो मीच ती भूमिका करावी, ह्यावर ठाम दिसला. त्याच्या बोलण्यातून त्याचं ह्याविषयीवरच गांभीर्य जाणवत होतं. मी एकदा रामूचा एका चित्रपट करताना कोणीतरी सेटवरचंच मी अरूण गवळीसारखा दिसू शकतो, असं म्हटलंच होतं, तेही त्यावेळी एकदम आठवलं. मग ठरवलं, एकदा करून पाहूया. अंकुशच्या व्हिजनने जाऊया.”
 
मकरंद देशपांडेचे कुरळे आणि घनदाट केस आहेत आणि त्याविरूध्द अरूण गवळीचा लूक. त्यामूळे सुरूवात केसांपासून करायची होती. मकरंद सांगतो, “ मी अरूण गवळीचा फोटो घेऊन माझ्या पार्ल्याच्या न्हाव्याकडे गेलो. आणि मला असे केस कापून दे, असं म्हटलं. तर तो दचकलाच. त्याला जरा शॉकच बसला. नंतर त्याने केस कापले. मिशी तशी ट्रिम केली. मग मी अरूण गवळीसारखी टोपी आणि झब्बा-लेंगा घातला. आणि स्वत:ला आरशात पाहिल्यावर मलाही आश्चर्य वाटलं की, अरे मी किती हूबेहूब डॅडी दिसतोय. मग अंकुश समोर गेलो. तर तोही माझ्याकडे पाहतच राहिला. म्हणतात, ना, जगात आपल्यासारखे सहा चेहरे असतात. आजपर्यंत मला माझ्यासारखे दोन चेहरे सापडले, एक विरप्पन आणि दूसरा अरूण गवळी.”
 
पुढील स्लाइडमध्ये वाचा, मकरंदच्या ‘डॅडी’ला पाहून का घाबरला बॉलीवूडचा ‘डॅडी’