आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Artist Watched First Episode Of Mazhe Pati SaubhagyaVati Together On Set

तेजश्री प्रधान पोहोचली ‘माझे पती सोभाग्यावती’च्या सेटवर, पहिला भाग पाहिला सर्वांनी एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘माझे पती सौभाग्यवती’चा पहिला एपिसोड ‘झी मराठी’वर टेलिकास्ट होत होता, आणि मालिकेची अख्खी टीम सेटवर एकत्र जमली होती. मोठ्या स्क्रिनवर मालिकेचा पाहिला एपिसोड लागला होता. आपण इतके दिवस केलेली मेहनत टीव्हीवर पाहताना कशी वाटतेय, ह्याचा अनुभव निर्माता-दिग्दराशक मंदार देवस्थळी आणि अभिनेता वैभव मांगलेसह सगळेजण घेत होते.
ह्या मालिकेत नसलेल्या पण मंदारच्याच ‘होणार सून मी ह्या घरची’मध्ये असलेल्या दोन व्यक्ती तेजश्री प्रधान आणि प्रसाद ओक आवर्जून मंदारला शुभेच्छा द्यायला पोहोचले होते. शिट्या आणि टाळ्यांच्या गजरात मालिकेचा पहिला भाग सर्व कलावंतांनी एकत्र पाहिला. तेजश्रीने तर ‘माझे पती’ची मूख्य अभिनेत्री नंदिता धुरीला मिठीच मारली.
तेजश्री म्हणते, “ होणार सून मी ह्या घरची’चा पहिला भाग सूध्दा आम्ही असाच एकत्र बसून पाहिला होता. माझी एन्ट्रीसूध्दा नंदितासारखीच कपाळाला कुंकू लावताना झाली होती. आणि तेच मी नंदिता जेव्हा मिठी मारली तेव्हा सांगितलं.”
मालिका संपताच वैभव मांगलेला तर सातत्याने शुभेच्छांचे कॉल्सयेऊ लागले होते. वैभव मांगले सांगतो, “ह्या शुभेच्छाच सांगतायत, की, मी जी मालिका निवडली, ती अगदी योग्य निवडली. पहिला प्रोमो लोकांनी पाहिला तेव्हापासून लोकांना ह्या मालिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे. हया गोष्टीने जोश येतो.”
मालिकेत वैभवच्या बायकोच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री नंदिता धुरी म्हणते, “ आता लोकं भेटतात, किंवा बोलतात तेव्हा मालिकेविषयी त्यातल्या कथानकाविषयी खूप प्रश्न विचारतात. आम्ही इतके दिवस काम करत होतो. तेव्हा काहीच समजत नव्हतं. कोणत्या दिशेने चाललोयत, बरोबर अभिनय करतोय की नाही, असे नाना प्रश्न होते. पण आता मात्र एका चौकटीत बसलेलं कथानक आमच्यासमोर आलंय. आता बघून छान वाटतंय.”
मालिकेचा निर्माता-दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणतो,“ मालिकेची कल्पना झीच्या क्रिएटीव्ह टीमला सुचली. त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली. मग वैभवने त्यात रंग भरले. आता तर प्रोमो पाहिल्यावर आणि मालिका पाहिल्यावर मित्र म्हणू लागलेत, की बहूदा तुझे प्रॉडक्शन हाऊस आता मराठीतले ‘बालाजी फिल्म्स’ होणार असे दिसतंय. कारण आठ आणि साडेआठ दोन्हीवेळी अर्धा तासाच्या मालिकेची मीच निर्मिती करतोय.पण एकूणच हा एक सुखद अनुभव आहे.”
(फोटो-प्रदिप चव्हाण)
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मालिकेच्या सेटवरचे फोटो