आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arya Ambekar Entered In Marathi Film Industry As A Leading Actress In New Film Rangila Re

केतकी माटेगांवकरनंतर आता आणखी एक 'लिटील चॅम्प' झळकणार रुपेरी पडद्यावर, जाणून घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो- केतकी माटेगांवकर आणि आर्या आंबेकर - Divya Marathi
फाइल फोटो- केतकी माटेगांवकर आणि आर्या आंबेकर
झी मराठीवर 2008 मध्ये रंगलेल्या ‘सारेगमप लिटील चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम फेरीत पोहोचलेली केतकी माटेगावकर पार्श्वगायिकेसोबतच अभिनेत्री म्हणून नावारुपास आली आहे. आता केतकीनंतर आणखी एक लिटील चॅम्प मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज झाली आहे. या लिटील चॅम्पचे नाव आहे आर्या आंबेकर. आर्या आता लवकरच मोठ्या पडद्यावर अभिनेत्रीच्या रूपात समोर येणार आहे. गायनामध्ये यशस्वी झाल्यानंतर आर्या आता अभिनयातही नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. मूळची नागपूरची असलेली आर्या ‘रंगीला रे’ या सिनेमात अभिनय करताना दिसणार आहे.
'रंगीला रे' ही एक लव्हस्टोरी असून यात आर्या मुख्य भूमिकेत आहे. सेव्हन हॉर्स एन्टरटेनमेंट प्रा. लि. च्या बॅनरखाली तयार होणार्‍या या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे पराग भावसार यांनी. यापूर्वी बर्‍याचशा सिनेमांमध्ये आणि मालिकांमध्ये अभिनय करणार्‍या पराग भावसार यांनी मालिका दिग्दर्शन आणि काही सिनेमासाठी सहदिग्दर्शकाची भूमिका बजावली आहे.
आपल्या या पहिल्याच मराठी सिनेमाबाबत आर्या खूप उत्साहित आहे. सिनेमातील इतर कलाकारांची निवड प्रक्रिया सध्या सुरू असून यानंतर लगेचच ‘रंगीला रे’ च्या चित्रीकरणाला प्रारंभ केला जाणार आहे. या सिनेमातही आर्या प्लेबॅक करणार आहे. सिनेमाचे संगीत प्रवीण कुँवर यांनी दिलंय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, आर्याचे लेटेस्ट फोटोज...