Home »Bollywood »Marathi Cinekatta» Arya Ambekar Talking About GudiPadwa Festival And Shares Her Memories

सेलिब्रिटींचा गुढीपाडवा : आर्याला कडुलिंबाच्या पानांची चव चांगलीच लक्षात राहिली!

समीर परांजपे | Mar 24, 2017, 00:36 AM IST

'सारेगमप' या कार्यक्रमात आर्या आंबेकर तिच्या लहानपणी सहभागी झाली. तिचा सुमधूर आवाज लोकांना फारच आवडला. ती तेव्हापासूनच सेलिब्रिटी झाली. यंदाच्या वर्षी 'ती सध्या काय करते' या मराठी चित्रपटात भूमिका करुन तिने रुपेरी पडद्यावरही पदार्पण केले. तिच्या फॅन्समध्ये झालेली प्रचंड वाढ ही जशी तिच्या गाण्यामुळे आहे तशीच तिच्या अभिनयामुळेही झाली. आर्या आंबेकर पुण्याची. तिच्या गुढीपाडव्याच्या खास आठवणी आहेत.
आर्या आंबेकर म्हणाली, `गुढीपाडव्याच्या माझ्या लहानपणीच्या फार रम्य आठवणी आहेत. गुढीपाडव्याच्या दिवशी माझे बाबा सकाळी गुढी उभारायचे. तिच्यासमोर नैवेद्य दाखविला जायचा. गुढीसमोर आरती केली जायची. गुढीला जी बत्ताशांची माळ घातली जाते ते बत्तासे खायला मला खूप आवडते. त्यामुळे त्याकडेही माझे लक्ष असायचे! आमचे आध्यात्मिक गुरु इंदुरचे माधवनाथ महाराज यांची गुढीपाडव्याच्या दिवशी तिथीने वाढदिवस असतो. त्यामुळे माधवनाथ महाराजांचे आमच्या घरात जे छायाचित्र आहे त्यासमोर भक्तिगीत म्हणण्याचा प्रघात दरवर्षी आमच्या घरी असतो. माझी आजी, आई व मी असे तिघेही गाणारे. माझे वडील उत्तम तबला वाजवतात. घरात सगळे संगीताचेच वातावरण असल्याने आमच्या घरी साजरा होणारा गुढीपाडवा हा खऱ्या अर्थाने संगीतमय असतो. लहानपणापासून मी हे सारे आनंदी वातावरण अनुभवत आले आहे.'

पुढे वाचा, सारेगमप कार्यक्रमात सहभागी झाल्यापासून हा सण ठरला खास...

Next Article

Recommended