आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अस्स सासर सुरेख बाई'मध्ये संतोषचे कमबॅक, मालिका सोडल्याच्या बातम्यांना पुर्णविराम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'अस्स सासर सुरेख बाई'मध्ये यश कामानिमित्त राजस्थानला गेला. मध्यंतरी उठत असलेल्या बातम्या की संतोष जुयेकर मालिका सोडणार का? तो परत मालिकेमध्ये येणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये कामानिमित्त राजस्थानला गेलेला यश परतला आहे. कारण यशला एक गोड बातमी कळली आहे. ती बातमी एकून यशला परतण्याखेरीज काही पर्यायच उरलेला नाही. कारण त्याची बहीण रेखा आई होणार आहे आणि ही बातमी कळताच तो घरी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
यशच्या बहिणीकडे रेखाकडे गुड न्यूज आहे हे कळताच काम झाल्या झाल्या यश महाजन घरी परत येणार आहे... त्याच्या स्वागताला अर्थातच यशच्या लाडक्या जुई madam असतील, पण गंमत तर पुढे आहे... रेखाला सरप्राईझ द्यायचं म्हणून यश आणि जुई घर सजवतात. बाळांचे फोटो, फुगे, चित्र यामुळे चाळीतल्या दहा बाय दहाच्या घराचं रूप पालटतं.
जुई आणि यश उत्साहात सगळं घर सजवतात आणि घरच्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसतो. रेखा तर भयंकर खुश होते. होणाऱ्या बाळाच्या मामा-मामींचा उत्साह बघून सगळे सुखावतात. यश-जुई गुड न्यूज कधी देणार याकडे मात्र साऱ्या महाजन कुटुंबाचं लक्ष लागलं आहे, हे वेगळ सांगायला नको !

पुढील स्लाईड्समध्ये बघा, यश-जुईची खास छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...