आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : \'असे हे कन्यादान\' मालिकेने घेतला निरोप, शेवटच्या दिवशी कलाकारांनी केली धमाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झी मराठी वाहिनीवरील असे हे कन्यादान या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. कार्तिक आणि गायत्रीच्या लग्नाने या मालिकेची सांगता झाली. तब्बल एक महिना कार्तिकची सत्वपरीक्षा घेऊन सदाशिवांनी त्याला गायत्रीसाठी योग्य वर म्हणून निवडले. कार्तिकने सदाशिवांना आपल्या सच्चेपणाच्या बळावर जिंकून घेतले. कार्तिकच्या आजीनेही गायत्रीला आपली नातसून म्हणून पारखून घेतले. दोघांच्या घरांमध्ये एकमत झाल्यावर कार्तिक-गायत्रीच्या लग्नाचा मुहूर्त ठरला आणि मालिकेचा गोड शेवट झाला.
या मालिकेत मधुरा देशपांडे, शरद पोंक्षे, राधा सागर, प्रसाद जवादे या कलाकारांनी आपल्या अभिनयाने रंग भरले होते. निश्चित या मालिकेचे चाहते आपल्या लाडक्या कार्तिक आणि गायत्रीला मिस करतील.
या मालिकेच्या शेवटच्या शूटच्या दिवशी सर्व कलाकारांनी सेटवर भरपूर धमाल केली. या कलाकारांनी केलेली धमाल तुम्ही पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन छायाचित्रांमध्ये बघू शकता.