Home | Bollywood | Marathi Cinekatta | Ashok Saraf Starer Marathi Film Shentimental Official Trailer Release

VIDEO : अशोक सराफ यांच्या ‘शेंटीमेंटल’चा ट्रेलर रिलीज, बघून हसून-हसून व्हाल लोटपोट

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 19, 2017, 07:28 PM IST

'पोश्टर बोइज' आणि 'पोश्टर गर्ल'मुळे हसता हसता ‘सेंटीमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे.

 • Ashok Saraf Starer Marathi Film Shentimental Official Trailer Release
  'पोश्टर बोइज' आणि 'पोश्टर गर्ल'मुळे हसता हसता ‘सेंटीमेंटल’ करणारा लेखक आणि दिग्दर्शक अशी समीर पाटील यांची ओळख झाली आहे. अशोक सराफ यांना पोस्टररुपी दिलेल्या आगळ्या वेगळ्या शुभेच्छांमुळे त्यांच्या नवीन ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती, परंतु आता नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टीजरमुळे’ समीर पाटील यांनी यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा तुफान मनोरंजक तडका प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे याची खात्री पटते.

  अभय जहिराबादकर, समीर पाटील, संतोष बोडके, मंजुषा बोडके निर्मित आणि आर. आर. पी. कॉर्पोरेशन, डॉ. अंबरीश दरक, बनी डालमिया प्रस्तुत ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटातून मराठी सिनेमा ‘फर्स्ट टाईम’ बिहारला पोहोचणार असून महाराष्ट्र पोलिसांच्या एका ‘इंटर स्टेट ऑपरेशनची’ इंटरेस्टिंग कथा या चित्रपटाच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे.
  या चित्रपटात अशोक सराफ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्यासोबत उपेंद्र लिमये, विकास पाटील, पल्लवी पाटील, सुयोग गोऱ्हे, देवयानी यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि रघुवीर यादव यांची ‘फुल टू कॉमिक अॅक्शन’ असणारा हा चित्रपट येत्या 28 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
  पुढील स्लाईड्सवर बघा, हसूनहसून लोटपोट करणा-या 'शेटिंमेंटल'चा ट्रेलर आणि सोबतच वाचा. अशोक सराफ यांच्या वाढदिवशी झाली होती चित्रपटाची घोषणा.

 • अशोक सराफ यांच्या वाढदिवशी झाली होती चित्रपटाची घोषणा...

   
  हवालदाराचा वेष अशोक सराफ यांच्यासाठी खूप खास आहे. 1975 मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज 42 वर्षानंतर ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटात देखील ते हवालदारच्या, किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या भूमिकेत येत आहेत. अशोक मामांचा अभिनय आणि संवाद शैलीतील‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीत तोड नाही. गेली 40-45 वर्षं आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या, प्रसंगी मामा बनवणाऱ्या मामांच्या वाढदिवशीच म्हणजे 4 जून रोजी ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली होती.  

Trending