आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आता अशी दिसते अश्विनी भावे, असा आहे 80-90चा काळ गाजवणा-या अॅक्ट्रेसेसचा लेटेस्ट LOOK

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी छाप उमटवणा-या अभिनेत्री अश्विनी भावे यांचा आज (7 मे) वाढदिवस असून त्यांनी वयाची  45 वर्षे पूर्ण केली आहेत. 1987 साली 'राजलक्ष्मी’ या सिनेमातून त्यांनी आपल्या करिअपला सुरुवात केली. त्यानंतर 'किस बाई किस’, 'अशी ही बनवाबनवी’, 'कळत नकळत’, 'झुंज तुझी माझी’, 'वजीर’ यांसारखे सिनेमे केले. 1991 मध्ये ’हिना’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. 'हनिमून’, 'मोहब्बत की आरझू’, 'अशान्‍त’, 'सैनिक’, 'जखमी दिल’ या हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली.

अश्विनी यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केले. किशोर हे एका इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत. अश्विनी यांना दोन मुले असून त्या सन फ्रॅन्सिस्कोला (अमेरिका) राहतात. लग्नानंतर ब-याच वर्षांनंतर त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पुन्हा प्रवेश केला तो एक निर्माती म्हणून. त्यांनी निर्मिती केलेला 'एवढंसं आभाळ’ या सिनेमाचे बरेच कौतुक झाले. याशिवाय ब-याच वर्षांनी 'आजचा दिवस माझा' या सिनेमात त्यांनी अभिनयसुद्धा केला. काही दिवसांपूर्वीच त्यांचा 'ध्यानीमनी' हा सिनेमा रिलीज झाला होता. 

अश्विनी भावे यांच्याप्रमाणेच ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सुप्रिया पिळगावकर, निवेदिता जोशी-सराफ, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, ऐश्वर्या नारकर, वर्षा उसगांवकर, प्रतिक्षा लोणकर या अभिनेत्रींनी अभिनयाने मराठी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. या अभिनेत्रींचा एक मोठा चाहता वर्गदेखील आहे. आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेक वर्षे या अभिनेत्रींनी सिनेमांत आपला दबदबा कायम ठेवला. यापैकी काही जणी आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत, तर काहींना मात्र आता काम कमी केले आहे.

या सौंदर्यवती आज कशा दिसतात हे तुम्हाला ठाऊक आहे का ? अनेक अभिनेत्रींनी आता वयाची पन्नाशी ओलांडली आहे. वाढत्या वयोमानानुसार त्यांच्यात बराच बदल झालेला दिसून येतोय. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्री आता कशा दिसतात हे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.

80-90चा काळ गाजवणा-या अभिनेत्रींचे आताचे रुप बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...