आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्विनी भावे यांचं संवेदनशील पाऊल, 'द ह्युमन एक्सपेरीमेंट' डॉक्युमेंट्रीची निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणताही हाडाचा कलाकार आपल्या मातीतील सिनेसृष्टीपासून कितीही दूर गेला तरी कलेपासून मात्र दूर राहू शकत नाही. याचा प्रत्यय भारतीय सिनेसृष्टीत मानाचं स्थान असणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावेंकडे पाहिल्यावर येते. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्याअश्विनी आजही भारतीयसृष्टीत मोलाचं योगदान देत आहेत. अमेरिकेहून येऊन ‘कदाचित’ सारख्या सिनेमाची निर्मिती करणं असो, ‘आता होऊन जाऊ दया’ सारख्या रिअॅ‍लिटी शो मध्ये परिक्षकाच्या रुपात स्पर्धकांच्या कलागुणांचं मूल्यमापन करणं असो किंवा ‘आजचा दिवस माझा’ सारखा सिनेमा असो. प्रत्येकवेळी अश्विनी भावे यांनी प्रवाहापेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्याचं कौतुकच झालं आहे. ग्रेट मराठा प्रॅाडक्शनच्या आगामी सिनेमातही अश्विनी अत्यंत वेगळ्या भूमिकेत समोर येणार आहेत.
अभिनयाप्रमाणे लेखनशैलीतही अश्विनी भावे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. 1998मध्ये त्याचं ‘मनोभावे’ हे पुस्तक प्रकाशित झालं. आदिवासींची वारली कला आणि जीवनावर आधारित ‘वारली आर्ट अॅण्डकल्चर’ नावाची डॉक्युमेंट्री अश्विनी यांनी २००२ साली बनवली. मामि फिल्म फेस्टीव्हमध्ये प्रदर्शित झालेल्या याडॉक्युमेंट्रीची निर्मिती लेखन आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी अश्विनी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली होती. आता त्यांनी एक नवं पाऊल उचललं आहे. मानवी जीवाशी खेळणाऱ्यांचा पर्दाफाश करणाऱ्या‘द ह्युमन एक्सपेरीमेंट’ नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा या डॉक्युमेंटरीबाबत अधिक माहिती...