आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'day : वन रुम किचन ते थ्री बीएचके फ्लॅटपर्यंतचा कसा झाला या फेमस मराठी अॅक्ट्रेसचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः स्वप्नातील घर घेण्याची इच्छा प्रत्येकाची असते. मग ती सामान्यातील सामान्य व्यक्ती असो वा सेलिब्रिटी, घर हा प्रत्येकाच्या जिवाळ्याचा विषय असतो. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आयुष्यातील अनेक वर्षे भाड्याच्या घरात काढली असतील, तर त्याच्यासाठी स्वतःचे हक्काचे घर मग ते अगदी वन रुम किचन असो वा मोठा बंगला हे एखाद्या राजमहालाप्रमाणेच असते. असेच काहीसे घडले आहे अभिनेत्री स्वाती देवल हिच्या बाबतीत. स्वाती ही मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रस्थापित अभिनेत्री असून आज तिचा वाढदिवस आहे.
कुंकू, कळत नकळत, पारिजात, वादळवाट, विवाहबंधन, फु बाई फु, पुढचं पाऊल यांसह अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला आहे. बाळाच्या जन्मानंतर तिने काही काळ अभिनयापासून ब्रेक घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा ती अभिनयाकडे परतली आहे. झी मराठी वाहिनीवरील 'अस्मिता' या मालिकेत स्वातीची एन्ट्री झाली आहे. प्रेग्नेंसीनंतर स्वाती लठ्ठ झाली होती. मात्र आता ती पुन्हा स्लिमट्रीम झाली आहे. 'चला हवा येऊ द्या' या गाजत असलेल्या शोमध्ये संगीत संयोजकाची भूमिका पार पडत असेलला तुषार देवलची स्वाती पत्नी आहे. अलीकडेच या दाम्पत्यानेत्यांचे स्वप्नातील घर घेतले आहे. याच वर्षी दोघांनी आपल्या चिमुकल्यासोबत नवीन घरात गृहप्रवेश केला आहे.
मुंबईत स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न त्यांचे सत्यात उतरले आहे. मात्र बोरिवलीत थ्री बीएचके फ्लॅट खरेदी करण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. त्यांच्या या प्रवासाविषयी आणि नवीन घराविषयी सांगतेय स्वाती...
पुढे वाचा, स्वाती-तुषारचे सोळाव्या मजल्यावरील स्वप्नातील घर, काय आहेत घराची वैशिष्ट्ये... यांसह बरेच काही... सोबतच पाहा, नवीन घरातील गृहप्रवेशाची आणि घराची खास छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...