(फाइल फोटोः अभिनेत्री अमृता खानविलकर)
नाशिक : मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिक येथे सिनेमाच्या प्रमोशनवेळी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सविस्तर वृत्त असे, की नाशिकमधील एका कॉलेजमध्ये अमृता तिच्या आगामी 'बाजी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी काही टवाळखोरांनी फेकलेला दगड अमृताच्या कानाला लागला. अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा यावेळी स्टेजवर उपस्थित होता.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृताने सांगितले, की आम्ही नाशिकमधील एका कॉलेजमध्ये सिनेमाचे प्रमोशन करत होतो. त्यावेळी जमावातून आलेला दगड मला लागला. मात्र मला फार मोठी दुखापत झाली नाही. पण हा हल्ला कोणी जाणीवपूर्वक केला असेल, असं मला वाटत नाही.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नाशिकच्या कॉलेजमध्ये प्रमोशनसाठी आलेल्या अमृता खानविलकर, श्रेयस तळपदे आणि जितेंद्र जोशीची छायाचित्रे... येथेच अमृताला दुखापत झाली...