आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आम्ही नुसते ओठ हलवत नव्हतो, खरेच गात होतो\' - अजय गोगावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबादमध्ये वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ दरम्यान झालेल्या गोंधळाविषयी गायक-संगीतकार अतुल गोगावले यांनी खुलासा केला आहे. या कार्यक्रमात साऊंड ट्रॅक अचानक बंद पडल्यामुळे अजय-अतुल यांची तारांबळ उडाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून आमच्या विरोधात जाणुनबुजून नकारात्मक गोष्टी पसरविण्यात येत असल्याचा दावा अतुल यांनी केला. आम्ही नुसते ओठ हलवत नव्हतो, आम्ही लाइव्ह गात होतो, असे ते म्हणाले आहेत.
स्पष्टीकरण देताना अतुल गोगावले म्हणाले, की संपूर्ण भारतात आम्ही लाइव्ह कॉन्सर्ट करत असतो. ही काही पहिली वेळ नव्हती की आम्ही अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम करत होतो. महाराष्ट्रामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट ही संकल्पना मुळात आम्ही आणली असतानाही आम्ही लोकांसमोर असे का करु हा प्रश्न मलाच पडला आहे. ज्या रसिकांनी आम्हाला डोक्यावर घेतले, त्यांची फसवणूक करण्याची आम्ही कल्पनाही करु शकत नाहीत. या कार्यक्रमात काही तांत्रिक बिघाडामुळे काही अडचणी आल्या. मायनक ट्रॅकऐवजी प्लस ट्रॅक लागला आणि श्रोत्यांचा गैरसमज झाला, असेही ते म्हणाले. या प्रकारामुळे आम्ही दोघंही यामुळे खूप दुखावलो गेलो आहोत.
भारतात 120 वादक आणि भव्य व्यासपीठावर लाइव्ह परफॉर्मन्स देणारे आम्ही पहिलेच आहोत. आतापर्यंत असे कधीही घडले नव्हते. ज्या कलेची आम्ही पूजा करतो, ज्या प्रेक्षकांनी आम्हाला मोठं केलं आहे त्यांच्याशीच आम्ही प्रतारणा कशी करु? त्या कार्यक्रमात अनेक गोष्टींची उणीव होती. या गोष्टींवर पडदा टाकण्यासाठी हा सर्व प्रकार करण्यात आला आहे असे मला वाटते, असे अतुल यांनी सांगितले. इतकेच नाहीतर साउंडट्रॅकवर गाणी वाजवायची असती तर 70 ते 80 लोकांना आम्ही तिथे कशाला सोबत नेले असते?, असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे.
पुढे बघा, वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील अजय-अतुल यांची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...