मुंबई: सैराट सिनेमातील 'झिंगाट' गाण्याने गायक, संगीतकार अजय-अतुल यांनी चाहत्यांना ठेका धरायला लावला. आता 'झिंगाट'नंतर अजय-अतुल त्याच पठडीतील ‘बेबी ब्रिंग इट ऑन’ हे गाणं घेऊन आले आहेत. गिरीश कुलकर्णी यांच्या आगामी 'जाऊं द्या ना बाळासाहेब’ या सिनेमातील ‘Baby Bring It On’ या गाण्याचा व्हिडिओ रिलीज करण्यात आला आहे. आधी या गाण्याचा टिझर गाण्यांच्या शब्दांसोबत रिलीज करण्यात आला होता. आता या व्हिडिओत कलाकारांचे धमाकेदार लूक्स बघायला मिळत आहे. सर्वांना आपल्या एक्सप्रेशनने पोट धरून हसायला लावणारा भाऊ कदम या गाण्यात लक्ष वेधून घेतो आहे. तर सईचा दिलखेचक अंदाज प्रेक्षकांना घायळ करणारा आहे.
‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ या सिनेमाचं दिग्दर्शन, लेखन स्वत: गिरीश कुलकर्णी यांनी केलं असून त्यांनीच या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबतच भाऊ कदम, सई ताम्हणकर, रिमा लागू यांच्याही यात महत्वाच्या भूमिका आहेत. हे गाणं अजय–अतुलने लिहिलं असून, या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे, तर अजय गोगावलेने हे गायलं आहे. 'जाऊं द्या ना बाळासाहेब' हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, ‘बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हू डॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला’ या धमाकेदार गाण्यातील सईचा लूक आणि सोबतच शेवटच्या स्लाईडमध्ये गाण्याचा व्हिडिओ...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)