आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FRIDAY RELEASE : मराठीत \'बायोस्कोप\', हिंदीत \'बजरंगी भाईजान\'ची बॉक्स ऑफिसवर टक्कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 जुलै हा दिवस सिनेरसिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचे कारण म्हणजे मराठी आणि हिंदीत दोन मोठ्या सिनेमांची ट्रीट सिनेरसिकांना मिळत आहे. मराठीच ‘बायोस्कोप’ आणि हिंदी सलमान खानचा ‘बजरंगी भाईजान’ हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या या सिनेमांपैकी सिनेरसिकांचा अधिक कौल कोणत्या सिनेमाला मिळणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
'बायोस्कोप'विषयी...
चार प्रतिभावंत दिग्दर्शकांनी, चार नामांकीत कवींच्या कवितांवर आधारीत हा सिनेमात तयार केला आहे. चार वेगवेगळ्या कथा यामध्ये बघायला मिळणार आहेत. मराठीत पहिल्यांदाच असा प्रयोग होत असून त्यामुळे या सिनेमाची उत्सुकता अर्थातच वाढली आहे. रवी जाधवांचा 'मित्रा', गजेंद्र अहिरे यांचा 'दिल-ए-नादान', विजू मानेंचा 'एक होता काऊ' आणि गिरीश मोहितेंचा 'बैल' या चार लघुपटांनी मिळून हा बायोस्कोप तयार झाला आहे. कवी लोकनाथ यशवंत, किशोर कदम, संदीप खरे आणि मिर्झा गालिब यांच्या कवितांवर चार कथा रेखाटल्या आहेत. या सिनेमाद्वारे कवी संदीप खरे पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर अभिनय करताना दिसणार आहे.
'बजरंगी भाईजान'विषयी...
अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या सिनेमाची त्याचे चाहते आतुरतेने वाट बघत होते. भारताच्या हद्दीत चुकून आलेल्या एका लहान मुलीला पाकिस्तानात पोहचवण्याची जबाबदारी 'बजरंगी भाईजान' अर्थात सलमान घेतो. आता त्याचा भारत ते पाकिस्तान प्रवास कसा होतो, हे प्रेक्षकांना या सिनेमात बघायला मिळणार आहे. ('बजरंगी भाईजान'च्या ऑन लोकेशनची छायाचित्रे बघण्यासाठी क्लिक करा...)

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, 'बायोस्कोप' या सिनेमाची खास झलक छायाचित्रांमध्ये...