आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'होणार सून मी ह्या घरची\' फेम शशांकचे अमृता-गश्मीरसोबत \'बेफिकर मन...\', बघा खास VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर आता मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. अमृता खानविलकर, नेहा महाजन, गश्मीर महाजनी यांच्यासोबत वन वे तिकीट या सिनेमात शशांक मुख्य भूमिकेत झळकत आहे. क्रूजवरून तीन सुंदर देशांची सफर घडवीत, मराठीतील ग्लॅमरस चेहऱ्यांना घेऊन तयार झालेला वन वे तिकीट या सिनेमातील बेफिकर मन... हे नवीन गाणे अलीकडेच रिलीज करण्यात आले आहे.
शशांक, अमृता आणि गश्मीर या त्रिकुटावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. या गाण्यात तिघांचाही ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेत आहे. ‘बेफिकर’ या रोमँटिक गाण्याला रोहित राऊत आणि श्रीनिधी घटाटे यांनी स्वरसाज चढवला आहे.
येत्या २३ सप्टेंबरपासून वन वे तिकीट हा सिनेमा मनोरंजनाची सफर घडवायला सज्ज झाला आहे. ‘व्हिडीओ पॅलेस’ आणि ‘मेकब्रॅंड प्रस्तुत’ या सिनेमाची निर्मिती कोमल उनावणे यांनी केली असून दिग्दर्शन कमल नथानी व अमोल शेटगे यांनी केलंय.

सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील तरुणाईला रिफ्रेश करणारं झालंय. अश्विनी शेंडे, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना गौरव डगांवकर यांनी संगीतबद्ध केलं आहे, तर पार्श्वसंगीत ट्रॅाय आरीफ यांचं आहे. या सिनेमात बेफिकरसह आणखी चार गाणी आहेत. ‘बेफिकर’ हे रोमँटिक गीत रोहित राऊत व श्रीनिधी घटाटे यांनी गायलं असून ‘रेश्मी रेश्मी’ हे दुसरं गीत आनंदी जोशी व गौरव डगांवकर यांच्या गायकीने खुललं आहे. इतर गीतांना सावनी रवींद्र, क्षितीज वाघ, अरुणिमा भट्टाचार्य, शीफा हरीस यांचा स्वरसाज लाभला आहे. खिळवून ठेवणारी कथा, नयनरम्य लोकेशन्स व सुरेल गीतांमुळे वन वे तिकीट प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.

काय आहे सिनेमाची वनलाईन...
'वन वे तिकीट' या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे कथानक पाच व्यक्ती व एका शानदार क्रुझवरचा त्यांचा प्रवास यावर बेतलेले असून त्यात अनपेक्षित घटनांचे खिळवून ठेवणारे चित्रीकरण पहायला मिळणार आहे. सचित पाटील, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी, शशांक केतकर, नेहा महाजन असे मराठीतील ग्लॅमरस चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. सोबत आशा शेलार, रॉजर डेकोस्टा यांच्याही भूमिका आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा, 'बेफिकर मन' या गाण्यासोबतच सिनेमाचा खास ट्रेलर....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...