आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा चिन्मय-मधुरा स्टारर ‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकाची पडद्यामागील खास छायाचित्रे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘मिस्टर अँड मिसेस’ या नाटकाने नुकतेच 175 यशस्वी प्रयोग पूर्ण केले. या निमित्ताने हे नाटक पाहण्यासाठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी उपस्थित दर्शवली होती.
‘मिस्टर अँड मिसेस’ नाटकात मुख्य भुमिकेत चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर-साटम आहे. तर या नाटकाचं दिग्दर्शन प्रियदर्शन जाधवने केले आहे. नाटकाची निर्मिती अभिजीत साटम, नरेंद्र चव्हाण, आणि रूजूता चव्हाणने केली आहे.
या सर्व स्टार्सनी आपल्या दमदार अभिनयाचा तडका या नाटकात लावला आहे. नाटक पाहण्यासाठी उपस्थित आलेल्या कलाकारांनीसुध्दा भरभरून प्रतिक्रिया दिल्या. नाटकाच्या प्रयोगादरम्यान एक छोटीशी पार्टीदेखील आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये चिन्मयी सुमीत, सुमीत राघवन, कविता लाड, श्रेयस तळपदे, मृणाल कुलकर्णी, किशोरी शहाणेसह अनेक कलाकारांनी केक कापून या सेलिब्रेशन केले.
नाटकाच्या पडद्यामागील काही छायाचित्रे divyamarathi.comच्या फोटोग्राफरने क्लिक केली आहेत. आज आम्ही तुम्हाला या नाटकाच्या पडद्यामागील काही खास क्षणचित्रे दाखवत आहोत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, मिस्टर अँड मिसेस नाटकाच्या पडद्यामागील खास छायाचित्रे आणि नाटकाला कोण-कोणते स्टार्स उपस्थित होते...
सर्व फोटो- अजित रेडेकर
बातम्या आणखी आहेत...