आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चला \'कच्चा लिंबू\'च्या शूटिंग सेटवर, बघा फिल्मचे Behind The Scenes

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'नटरंग’, ‘बालगंधर्व’, ‘बालक-पालक’, ‘टाइमपास’ यासारख्या सिनेमांच्या दिग्दर्शन आणि निर्मितीनंतर रवी जाधव यांचे अभिनयात पदार्पण झाले आहे. तर ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम निर्माता मंदार देवस्थळी यांनी मालिकांच्या निर्मिती-दिग्दर्शनानंतर चित्रपट निर्मितीत पाऊल ठेवले. तर त्यांचा जवळचा मित्र आणि अभिनेता प्रसाद ओकने कच्चा लिंबूच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. या त्रयींची नवी इनिंग असलेला ‘कच्चा लिंबू’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज झाला आहे. रवी जाधवसह सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम आणि अनंत महादेवन यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका असून राहूल रानडे यांन चित्रपटाला संगीत दिले आहे. ब-याच वर्षांनी प्रेक्षकांना ब्लॅक अँड व्हाइट चित्रपट थिएटरमध्ये बघण्याची मेजवानी मिळाली आहे. पाहुयात या चित्रपटाचे बिहाइंड द सीन्स...
बातम्या आणखी आहेत...