आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘खुलता कळी खुलेना’च्या सेटवरचे हे Behind The Scenes पाहिलेत का तुम्ही!!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः  झी मराठी वाहिनीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. गेल्यावर्षी 18 जुलै रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला होता. मोनिका - विक्रांत आणि मानसी या तीन व्यक्तिरेखांभोवती मालिकेचे कथानक फिरते. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. ओमप्रकाश शिंदे, अभिज्ञा भावे, मयुरी देशपांडेसोबत संजय मोने, मानसी मागीकर आणि आशा शेलार या कलाकारांच्या मालिकेत महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर या मालिकेच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत, तर संतोष भारत कणेकर यांच्या अथर्व थिएटर्स अॅंड इव्हेंट्स संस्थेने या मालिकेची निर्मिती केली आहे.

फावल्या वेळेत कलाकार करतात धमाल-मस्ती...
या मालिकेत मोनिकाचे विक्रांत आणि मानसीसोबत फारसे पटत नसले, तरी प्रत्यक्षात मात्र ती या दोघांची खूप चांगली मैत्रीण आहे. या तिघांमध्ये स्ट्राँग बाँडिंग असल्याचे पडद्यामागील क्लिक झालेल्या फोटोजमध्ये दिसून येते. फावल्या वेळेत सेल्फी घेणे हा या तिघांचा जणू आवडता छंद आहे, असे म्हटले तरी वावगे ठरु नये. कारण मालिकेचे बिहाइंड द सीन्समध्ये या तिघांच्या भरपूर सेल्फीज बघायला मिळतात. इतकेच नाही तर या मालिकेतील चिमुकली ईशा अर्थातच गार्गीसुद्धा या तिघांसोबत खूप धमाल करताना दिसते. आज या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला ‘खुलता कळी खुलेना’च्या सेटवरचे हेच Behind The Secnce घेऊन आलो आहोत. 

चला तर मग पाहुयात, पडद्यामागे मालिकेतील कलाकार कशी करतात धमाल...  
 
बातम्या आणखी आहेत...