Home »Bollywood »Marathi Cinekatta» Bhagyashree Daughter Avantika Dasani To Debut In Bollywood

मराठमोळ्या भाग्यश्रीच्या या सौंदर्यवती कन्येला सलमान देणार ब्रेक, मिस्ट्री बॉयला करतेय डेट !

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 13:45 PM IST

मुंबई - केवळ एकाच चित्रपटातून नावारुपाला आलेली अभिनेत्री भाग्यश्री तिच्या लाईफ स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. एक चित्रपट करुन भाग्यश्रीने लगेचच संसार थांटला होता. हिमालय दसानी या चित्रपट निर्माता, अभिनेता आणि आता बिझनेसमनसोबत तिने लग्न केले. भाग्यश्रीला आता दोन मुले असून तिचा मोठा मुलगा अभिमन्यू लवकरच चित्रपटांत डेब्यू करण्याच्या बातम्या आहेत. पण केवळ मुलगाच नाही तर तिच्या मुलीनेही डेब्यू केल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको. कारण भाग्यश्रीप्रमाणेच तिची मुलगीही फारच स्टायलिश आणि सुंदर आहे. सध्या अशी चर्चा आहे की बॉलिवूडचा टायगर सलमान खान तिला चित्रपटात ब्रेक देऊ शकतो.
भाग्यश्रीच्या मुलीचे नाव आहे अवंतिका दसानी. अवंतिका सध्या 22 वर्षाची आहे. तिने लंदनच्या Cass बिजनेस स्कूलमधून मार्केटींग आणि बिझनेसची पदवी घेतली आहे. इतर कोणत्याही स्टारकिडप्रमाणे अवंतिका ग्लॅमरस आहे. फिरण्याची शौकीन असलेल्या अवंतिका अनेक फोटोज तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करत असते. तिच्या फोटोंवरुन तिला पार्टी करण्याची खास आवड असल्याचे समजते. तिच्या काही फोटोंवरुन ती मिस्ट्री बॉयला डेट करत असल्याचेही समजते.

अवंतिकाचा हा ग्लॅमरस अवतार आपल्याला चित्रपटातही लवकरच पाहायला भेटतो की नाही हे येणारी वेळच सांगेल. तोपर्यंत पाहा अवंतिकाचे काही खास फोटोज्.

पुढच्या स्लाईडवर क्लिक करा आणि पाहा अवंतिकाचे काही खास PHOTOS..

Next Article

Recommended