आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'दिल दोस्ती दोबारा\' मधील या अॅक्टरची झाली Engagement, लवकरच होणार लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंगेटमेंटमध्ये केक कापताना विक्रांत आणि त्याची होणारी पत्नी अस्मिता. - Divya Marathi
एंगेटमेंटमध्ये केक कापताना विक्रांत आणि त्याची होणारी पत्नी अस्मिता.
 
एंटरटेनमेंट डेस्क - 'दिल दोस्ती दोबारा' या मालिकेमध्ये पप्या भाईच्या पाठिशी खंबीरपणे उभा राहणारा त्याचा साथीदार भपाव म्हणजेच विक्रांत शिंदे याला आता आयुष्याचा साथीदार मिळाला आहे. विक्रांत शिंदे याचा नुकताच साखरपुडा झाला. अस्मिता करंगुटकर हिच्याबरोबर लवकरच तो आता विवाह बंधनामध्ये अडकणार आहे. 

'दिल दोस्ती दोबारा' मालिकेमध्ये पुष्कराज चिरपुटकर हा भाईच्या भूमिकेत दाखवला आहे. तर विक्रांत शिंदे हा त्याच्या पंटरच्या म्हणजेच भपावच्या भूमिकेत आहे. पण पप्या भाईच्या एका इशाऱ्यावर कोणतेही काम करायला तयार होणाऱ्या भपावला आपल्या इशाऱ्यावर नाचवण्यासाठी त्याच्या आयुष्यात लाईफ पार्टनरची एंट्री झाली आहे. नुकत्यात एका सोहळ्यात त्यांचा साखरपुडा झाला. यावेळी दिल दोस्ती दोबाराच्या संपूर्ण टीमसह इतरही सेलिब्रिटींची उपस्थिती होती. दिल दोस्तीच्या टीममधील, अमेय वाघ, सुव्रत जोशी, सखी गोखले, स्वानंदी टिकेकर आणि पुजा ठोंबरे या सर्वांनी भपावच्या म्हणजेच विक्रांतच्या साखरपुड्याला आवर्जुन उपस्थिती लावली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, विक्रांत शिंदे उर्फ 'भपाव'च्या साखरपुड्याचे काही PHOTOS..
(फोटो विक्रांत आणि अस्मिता यांच्या फेसबूक पेजवरून साभार)
बातम्या आणखी आहेत...