'डॉ. नीलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे अशी आमची सगळीच टीम एक से बढकर एक आहे. कुणीच कमी नाही. विनोदाचे 'पंच' बऱ्याचदा ठरवता ऑनशूट होतात. स्क्रिप्ट लिहून, ती पाठ करून एपिसोड करण्यापेक्षा समोरच्याच्या पंचवर रिपंच मारत आम्ही ही मालिका सध्या नंबर एकवर नेऊन ठेवली आहे. आम्ही बऱ्याचदा संपूर्ण भागाचे चित्रीकरण सलगपणे केले आहे. त्यातून जे विनोद साधले गेले ते प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.' मालिकेच्या लोकप्रियतेचा असा उलगडा 'चला हवा येऊ द्या' फेम भारत गणेशपुरे यांनी केला.
'चला हवा येऊ द्या' या विनोदी मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. त्यात भारत यांनी साकारलेले थुकरटवाडीच्या सरपंचाचे पात्र अफलातून आहे. ते म्हणाले, 'मराठी रंगभूमीवर वऱ्हाडी भाषा मी आणली याचा मला अभिमान आहे. सुरुवातीपासून या भाषेच्या आधारे सादर केलेल्या विनोदाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. वऱ्हाडी भाषेतील विनोद आणि भारत गणेशपुरे हे आता समीकरणच झाले आहे. त्याचा अभिमान वाटतो. त्यामुळेच विनोदातून अनेकदा विदर्भातील प्रश्नही मांडतो. ते सुटण्याची अपेक्षा बाळगतो.'
पुढे वाचा, कसा झाला भारत गणेशपुरेंचा अभिनयातील प्रवास...