आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊला विचारा, असे म्हणत कुशलने शेअर केला VIDEO

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत भाऊ कदम, इनसेटमध्ये भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी - Divya Marathi
चला हवा येऊ द्याच्या टीमसोबत भाऊ कदम, इनसेटमध्ये भाऊ कदम यांची मुलगी मृण्मयी
आज दहावीचा निकाल लागला. 'चला हवा येऊ द्या' या शोमधून घराघरांत पोहोचलेले विनोदवीर भाऊ कदम यांची कन्या मृण्मयी कदम हीसुद्धा यंदा दहावीला होती. मृण्मयी फर्स्ट क्लासमध्ये दहावी पास झाली आहे. मुलगी पास झाल्याच्या निमित्ताने भाऊ कदम यांनी त्यांच्या 'चला हवा येऊ द्या' या शोमधील सहकलाकारांचे तोंड गोड केले. पोरगी पास होण्याचे सुख काय असतं, हे भाऊ कदमला विचारा असे, म्हणत कुशल बद्रिकेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुशल बद्रिके आणि भाऊ यांच्यासोबत श्रेया बुगडे, सागर कारंड भारत गणेशपुरे ही 'चला हवा येऊ द्या'ची टीम दिसतेय. या सर्वांनी मृण्मयीला शुभेच्छा दिल्या आहेत. 
 
व्हिडिओ शेअर करताना कुशलने लिहिले, 'भाऊ कदम यांची मुलगी फर्स्ट क्लासने पास झाल्याबद्दल भाऊ आणि मृण्मयी कदमचे अभिनंदन.' तर मृण्मयी हिनेदेखील या व्हिडिओला कमेंट करुन सगळ्यांचे आभार व्यक्त केले आहेत. मृण्मयी लिहिते, ''कुशल बद्रिके काका थँक यू सो मच... तुमच्या आशीर्वादाशिवाय मी काहीच नाही. थँक यू सो मच श्रेया बुगडे ताई, भरत काका, सागार काका... आणि आय अॅम सो सॉरी डॅड... प्रॉमिस नेक्स टाइम मी जास्त मार्क्स आणेल.''  

पुढच्या स्लाईडवर बघा, कुशल बद्रिकेने शेअर केलेला व्हिडिओ... 
बातम्या आणखी आहेत...