आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा भावंडांची एकुलती एक बहीण आहे स्वानंदी बेर्डे, अभिनयने सांगितली दिवाळीची खास आठवण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून लुक्स आणि अभिनयकौशल्याने प्रेक्षकांचा लाडका बनलेला अभिनय सध्या काय करतोय याची उत्सुक्ता त्याच्या फॅन्सला लागलेली असेल. एका चित्रपटानंतर सध्या अभिनय सचिन पिळगावकरांच्या चित्रपटात काम करत आहे. खास दिवाळीनिमित्त अभिनयने आमच्याशी खास मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्याच्या भाऊबीजेच्या आणि दिवाळीच्या काही आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या. दहा-बारा भावंडांची एकुलती एक बहीण आहे स्वानंदी...
 
दहा-बारा भावंडांची एकुलती एक बहीण आहे स्वानंदी...
अभिनय सांगतो, भाऊबीज हा आमच्या घरात वर्षातील सर्वात मोठा सण असतो कारण या दिवशी आम्ही सर्व भावंड एकत्र जमतो आणि फार धमाल करतो. स्वानंदी ही एकच बहीण आमच्या घरात आहे आणि आम्ही जवळपास दहा ते बारा भाऊ आहोत. यामुळे तिची आणि आमचीपण धम्माल असते.   
 
यंदा भाऊबीजेला देणार मोठे गिफ्ट..
अभिनय सांगतो, आता मी स्टार झालो आहे आणि स्वानंदीला माझ्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. स्वानंदीला मी एकदम फिल्मी भावासारखे तिला सरप्राईज गिफ्ट द्यावी अशी अपेक्षा आहे आणि ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल.
 
स्वतःसाठी घेणार हे गिफ्ट..
अभिनयने सांगितले की यंदा दिवाळीला तो स्वतःसाठी खूप कपडे घेणार आहे कारण त्याला प्रमोशन किंवा काही कार्यक्रम असला की वेगवेगऴळे कपडे घालावे लागतात आणि एकदा घातलेले कपडे तो रिपीट करु शकत नाही. सोबतच अभिनय स्वतःसाठी एक प्ले स्टेशन आणि महागडा फोन घेण्याच्या तयारीत आहे.
 
अशी होती आठवणीतील दिवाळी..
अभिनयने त्याच्या आठवणीतील दिवाळीनिमित्त काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्याने सांगितले, मी लहान होतो तेव्हा मला दिवाळीच्या दिवसातच हॉस्पीटलमध्ये अॅडमिट केले होते आणि श्वसनाचा त्रास असल्याने मला त्यांनी फटाके उडवण्यास मनाई केली होती. त्यावेळी मी हॉस्पीटलमध्येच रडायला सुरुवात केली होती. ही दिवाळी माझ्या आठवणीतील दिवाळी आहे.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिनय आणि स्वानंदीचे काही खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...