Home »Bollywood »Marathi Cinekatta» Bhetli Tu Punha Motion Pictures Marathi Movie

VIDEO: ‘भेटली तू पुन्हा’चित्रपटाचे मोशन पिक्चर, दिसला पूजा-वैभवचा रोमँटिक अंदाज

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 18:48 PM IST

मुंबई - “दूर तुझ्या असण्याने अस्वस्थ मी, आज तुला पुन्हा भेटून आश्वस्त मी” अशी टॅगलाईन देत ‘भेटली तू पुन्हा’या चित्रपटाचे मोशन पिक्चर कलाकार पूजा सावंत आणि वैभव तत्ववादी यांनी शेअर केले आहे. यातील वैभव आणि पूजाचा लुक पाहून तुम्ही नक्कीच त्यांच्या प्रेमात पडाल.
"जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही.. आपल्याला फक्त साईन सापडल पाहिजे" असे टॅगलाईन असणारी 'भेटली तु पुन्हा' चित्रपटाचे मोशन पिक्चर शेअर केले आहे.
हा चित्रपट अॅक्शन ड्रामा असलेली प्रेमकथा आहे. दगडी चाळनंतर दिग्दर्शक चंद्रकांत कणसे एक नवीन लव्हस्टोरी घेऊन प्रेक्षकांसमोर येत आहे. मोशन पिक्चर फार सुंदररितीने तयार करण्यात आले आहे.
(शेवटच्या स्लाईडवर व्हिडिओ)
पुढच्या स्लाईडवर पाहा, मोशन पिक्चरचे काही Stills...

Next Article

Recommended