आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची \'हीरोईन\', प्रियांका चोप्राच्या आईने पाहिला \'कच्चा लिंबू\', बघा स्पेशल स्क्रिनिंगचे PICS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'कच्चा लिंबू' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. रवी जाधव, सोनाली कुलकर्णी, मनमीत पेम, अनंत महादेवन आणि सचिन खेडेकर यांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांसोबतच समीक्षकांनीही कौतुकाची पावती दिली आहे.
 
चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मुंबईत स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. या स्क्रिनिंगला मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेत्री प्रियांका चोप्राची आई आणि निर्मात्या मधू चोप्रा यांची स्क्रिनिंगला खास उपस्थिती होती. त्यांनी चित्रपटातील सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले. शिवाय स्क्रिनिंगनंतर बराच वेळ त्यांच्याशी संवादही साधला. याशिवाय तेरे नाम या  चित्रपटात अभिनेता सलमान खानसोबत झळकलेली बॉलिवूड अभिनेत्री भूमिका चावला हिनेसुद्धा स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. बॉलिवूड अभिनेता के.के. मेननची पत्नी निवेदिता भट्टाचार्य, अभिनेते मकरंद देशपांडे  आणि 
मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक सचिन कुंडलकर हेसुद्धा यावेळी हजर होते. 
 
पुढील स्लाईड्सवर बघा, 'कच्चा लिंबू'च्या स्पेशल स्क्रिनिंगला क्लिक झालेली सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...
 
बातम्या आणखी आहेत...