आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathi Actor Suyash Tilak Celebrated His Birthday With Family And Friends

PHOTOS : 29 वर्षांचा झाला \'जय\', सई, अंकुशसह स्टार फ्रेंड्ससोबत दणक्यात साजरा केला B\'day

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सुयश टिळकच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज - Divya Marathi
अभिनेता सुयश टिळकच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोज

झी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या का रे दुरावा या मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका जय अर्थातच अभिनेता सुयश टिळकने नुकताच आपला 29 वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. 10 जानेवारी रोजी सुयशचा वाढदिवस होता. यादिवशी सुयशने एकदा दोनदा नव्हे तर तीनदा केक कापला. शिवाय मराठी इंडस्ट्रीतील त्याच्या स्टार फ्रेंड्सनी त्याच्यासाठी बर्थडे पार्टीचे आयोजन केले होते.
या पार्टीत सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, क्षिती जोगसह त्याचे बरेच फ्रेंड्स सहभागी झाले होते. सुयशचे आईवडीलसुद्धा या पार्टीत हजर होते. याशिवाय आगामी गुरु या सिनेमाच्या सेटवरदेखील सुयशचे बर्थडे सेलिब्रेशन झाले. गुरु सिनेमाचे दिग्दर्शक संजय जाधव, अभिनेता अंकुश चौधरी, उर्मिला कानेटकर-कोठारेसह सिनेमाच्या संपूर्ण टीमने सुयशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हर्षदा खानविलकर यांच्यासोबतही सुयशने आपला वाढदिवस साजरा केला.
सुयशने बर्थडे सेलिब्रेशनची खास छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइटवर शेअर करुन लिहिले, ''सर्व शुभाशिर्वाद birth day wishes, फूलं, cakes, chocolates, gifts, मिळाले .... प्रत्येकाला वैयक्तिकपणे thank you नाही म्हणू शकत नाही कारण खरच खूप मोठी यादी आहे... माझ्यावरच हे प्रेम असंच वाढत जावो ही माझी स्वार्थी इच्छा, मनापासून धन्यवाद ❤❤❤ आणि खूप खूप प्रेम..... नवीन वर्ष तूमच्या सह खूप आनंदाचे जाईल ह्याची खात्री वाटते...''
सुयशच्या बर्थडे सेलिब्रेशनची खास झलक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कसे झाले तुमच्या लाडक्या 'जय'चे बर्थडे सेलिब्रेशन...