आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियाचे हे PHOTOS बघून पुन्हा एकदा तुम्ही पडाल तिच्या प्रेमात, बघा बर्थडे गर्लची सोशल डायरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रिया बापट... मराठी चित्रपटसृष्टीतील देखणी आणि ग्लॅमरस अभिनेत्री. प्रिया प्रामुख्याने मराठी चित्रपट, नाटके आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये कार्यरत आहे. आज प्रियाने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. प्रियाने छोट्या पडद्यावर 'वादळवाट', 'शुभं करोती', 'अधुरी एक कहाणी', 'बंदिनी', 'आभाळमाया', 'दे धमाल', 'दामिनी' यांसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये अभिनय केला.
 
याशिवाय 'आम्ही ट्रॅव्हलर', 'सारेगमप', 'गुड मॉर्निंग महाराष्ट्र' या कार्यक्रमांच्या सुत्रसंचालनाची धुरा सांभाळली. 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'काकस्पर्श', 'हॅपी जर्नी', 'टाइमप्लीज', 'टाइमपास2', 'वजनदार' या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 'नवा गडी नवे राज्य' हे प्रियाचे गाजलेले नाटक आहे.  

प्रिया चित्रपटांमधून सोज्वळ आणि ग्लॅमरस लूकमध्ये आपल्या भेटीला आली आहे. निखळ सौंदर्य लाभलेल्या प्रियाचे इन्स्टाग्रामवर अनेक ग्लॅमरस फोटोज लक्ष वेधून घेतात. तिचे हे फोटोज बघून कुणालाही पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडावेसे वाटले नाही तरच नवल. 

 आज प्रियाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पाहुयात, प्रियाची इन्स्टाग्राम डायरी... 
बातम्या आणखी आहेत...