आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा घाबरायचा दिलीप प्रभावळकरांच्या आवाजाला, वाचा रंजक गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरुन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सुरु झालेला प्रवास आजही असाच सुरु आहे. वयाच्या 72 व्या वर्षीही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. बावळट चिमणराव, हसवाफसवीमधील सहा पात्रे, गतिमंद चौकट राजा, खलनायक तात्या विंचू, मुन्नाभाईतील गांधी... त्यांनी रंगवलेली प्रत्येक भूमिका वेगळी आणि प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी आहे. आज दिलीप प्रभावळकरांचा वाढदिवस आहे. 4 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेल्या प्रभावळकर 1972 सालापासून अभिनयाशी जुळलेले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्याशी निगडीत काही खास गोष्टी सांगत आहोत.
लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा घाबरायचा आवाजाला..
दिलीप प्रभावळकांनी 'झपाटलेल्या' या सिनेमात तात्या विंचूची भूमिका साकारली होती. सिनेमातील भूमिकेची लांबी फार कमी होती. पण सिनेमातील आवाज सगळ्यांनाच भावला. लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय त्यांच्या आवाजाला नेहमी घाबरायचा, असे स्वतः दिलीप प्रभावळकरांनी एका मुलाखतीत सांगितले होते.
दिलीप प्रभावळकरांविषयीच्या अशाच आणखी खास गोष्टी जाणून घेण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...